फरीद तनाशाच्या मारेकऱ्यांना त्याच्या पत्नीने ओळखले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

मुंबई- कुख्यात गुंड छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशा याचा सात वर्षांपूर्वी राहत्या घरात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. फरीदवर गोळीबार करणाऱ्यांना त्याची पत्नी रेश्‍मा हिने शनिवारी (ता. 18) विशेष मोक्का न्यायालयात ओळखले.

मुंबई- कुख्यात गुंड छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशा याचा सात वर्षांपूर्वी राहत्या घरात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. फरीदवर गोळीबार करणाऱ्यांना त्याची पत्नी रेश्‍मा हिने शनिवारी (ता. 18) विशेष मोक्का न्यायालयात ओळखले.

2 जून 2010 ला फरीदवर टिळकनगरमधील बिल्डिंग क्रमांक 87 च्या तळमजल्यावरील खोलीत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या वेळी त्याची पत्नी आणि मुलगी आतील खोलीत होत्या. विकसक दत्तात्रय भाकरे याच्यासोबत असलेल्या एका बांधकाम प्रकरणातील वादातून हा खून झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी पोलिसांनी रेश्‍मासह 52 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. पोलिसांनी सुरुवातीला तिचे नाव साक्षीदारांच्या यादीतून वगळले होते. फरीदचा खून होण्यापूर्वी तीन दिवस आधी आम्ही अजमेर शरीफ दर्ग्यात दर्शनासाठी गेलो होते; मात्र तनाशाची तब्येत बरी नसल्याने पुन्हा मुंबईला परतलो. खुनाच्या दिवशी आम्ही शयनगृहात बोलत असताना घरी आलेल्या दोघांनी बंदुकीतून फरीदवर गोळ्या झाडल्याचे रेश्‍माने न्यायालयात सांगितले. याप्रकरणी मोहम्मद साकीब शहनवाज आलम खान आणि रणधीर अशोक सिंग ऊर्फ निखिल या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी मला आरोपींच्या ओळखपरेडीसाठीही बोलावले होते. तळोजा तुरुंगात 4 ऑगस्ट 2010ला ही ओळखपरेड झाल्याचे तिने न्यायालयात सांगितले. आरोपी न्यायालयात उपस्थित आहेत का, असा प्रश्‍न विचारला असता तिने सिंग आणि साकीब खान याच्याकडे बोट दाखवून या दोघांनी माझ्या पतीवर गोळ्या झाडल्याचे सांगितले.

फरीद हा छोटा राजनसाठी काम करत असे. 2005 ते 2008 या काळात तो तुरुंगात होता. भाकरे बांधत असलेल्या इमारतीतील रहिवाशांना फरीद मदत करत असे. जीवाला धोका असल्याने तो क्वचित घराबाहेर पडे, असेही तिने न्यायालयात सांगितले. तिची साक्ष नोंदवून घेतल्यानंतर फिर्यादी पक्षाला तिची उलटतपासणीची संधी देत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.

टॅग्स

मुंबई

मुंबई - अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना महिलांकडे पाहून अश्‍लील कृत्य करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. तब्बल...

09.45 AM

ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये राबवण्यास...

09.30 AM

मीरा-भाईंदर - मीरा-भाईंदर महापालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवत सत्ता मिळविली. भाजपने जोरदार...

05.33 AM