पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई - देशातील पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. पुरुष महिलांपेक्षा अधिक मानसिक तणावाखाली असतात. कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. जीवन पद्धतीमुळे महिलांमध्ये पुरुषांपेक्षा लठ्ठपणाचे प्रमाण जास्त असते असे दिसून आले आहे.

या सर्वेक्षणात 20.7 टक्के महिला आणि 18.6 टक्के पुरुष लठ्ठ आहेत असे स्पष्ट झाले. शहरी भागातील 31 टक्के आणि ग्रामीण भागातील 15 टक्के महिला लठ्ठ आहेत. शहरातील 26 टक्के आणि ग्रामीण भागातील 14 टक्के पुरुष लठ्ठ असल्याचे आढळले. देशातील महिलांचे राहणीमान, शरीरात होणारे हार्मोनल बदल यामुळे महिलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे डॉ. जयश्री तोडकर यांनी सांगितले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लठ्ठपणाचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. जीवनशैलीमुळे हे घडते, असे डॉ. तोडकर यांनी सांगितले.

देशात महिलांपेक्षा पुरुषच जास्त मानसिक तणावाखाली असल्याचे हा सर्वेक्षणातून आढळून आले. देशातील 10.4 टक्के पुरुष आणि 6.7 टक्के महिला मानसिक तणावाखाली आहेत. शहरांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले.

Web Title: fat percentage big in women