मुंबई विद्यापीठातील शुल्कवाढीला विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही शुल्कवाढ योग्य नसल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे; मात्र ही वाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिपत्रक काढून शुल्कवाढीला विरोध दर्शवला आहे. नॅकच्या "अ' दर्जाच्या मूल्यांकनाची मुदत गुरुवारपासून (ता. 20) संपत आहे. त्यामुळे नॅकच्या मूल्यांकनाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणीही मनविसेचे उपाध्यक्ष संतोष धोत्रे यांनी केली. शुल्कवाढ रद्द न झाल्यास मनविसे आंदोलन करील, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबई विद्यापीठाने शुल्क दुपटीने वाढवल्यामुळे मध्यमवर्गीय मुलांना याचा चांगलाच फटका बसेल. विद्यार्थ्यांना "हेलिकॉप्टर राईड'मध्ये सवलत दिली जाते. शुल्कवाढीत सवलत का देत नाही, असा सवाल "स्टुडण्ट कौन्सिल ऑफ लॉ'चे सचिन पवार यांनी विचारला. शुल्कवाढ करूनही निकाल वेळेवर लागतील का, असे त्यांनी विचारले. राज्य सरकारने शुल्कवाढीचा भार उचलल्यास गरीब विद्यार्थ्यांना याची झळ बसणार नाही, असेही त्यांनी सुचवले.