अग्निशामक दलाला सीसीटीव्हीची मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : शहरात बसविलेल्या सीसीटीव्हीचा उपयोग अग्निशामक दलाला आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत त्वरित निर्णय घेण्यासाठी होणार आहे.

मुंबई : शहरात बसविलेल्या सीसीटीव्हीचा उपयोग अग्निशामक दलाला आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत त्वरित निर्णय घेण्यासाठी होणार आहे.

डिजिटल मुंबई प्रकल्पांतर्गत संपूर्ण शहरात पाच हजार सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यांची मदत अग्निशमन दलाच्या अद्ययावत कंट्रोल रूमसाठी होणार आहे.
एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत शहरात सीसी टीव्हीच्या फुटेजची मदत मिळावी यासाठी अग्निशमन दलाने ही यंत्रणा कंट्रोल रूमला जोडण्याचे ठरवले आहे. त्यामुळे एखाद्या दुर्घटनेच्या लाइव्ह फुटेजद्वारे निर्णय घेणे सोपे होईल, असे अग्निशमन दलाचे मत आहे.

मुंबईतील सीसी टीव्ही नेटवर्क अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला जोडल्यावर एखाद्या दुर्घटनेच्या सीसी टीव्ही फुटेजचे लाइव्ह स्ट्रिमिंग तेथील अधिकाऱ्यांना पाहता येईल.