जून, जुलैमध्ये मासेमारीवर बंदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जिवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने १ जून ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात व भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रापर्यंत (ईईझेड) मासेमारी बंदी  घोषित करण्यात आली  आहे. मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन, खराब तसेच वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्तहानी यांचे रक्षण करणे तसेच शाश्वत मच्छीमार व्यवस्थापनाच्या हेतूने १ जूनच्या शासन निर्णयानुसार मासेमारी बंदी घोषित करीत असल्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Fishing ban in June, July