सावित्री नदीवरील पूल गेला वाहून;2 मृतदेह हाती

बुधवार, 3 ऑगस्ट 2016

अलिबाग - मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पुल मुसळधार आलेल्या पावसामुळे वाहून गेला. या पुलावरून जाणाऱ्या दोन एस. टी. बसेसह इतर 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, 22 जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे. दरम्यान बचाव पथकाला दोन मृतदेह हाती लागले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाडकडे रवाना झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तसेच सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून बचावकार्य सुरु करण्यात आले नाहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली असून, पर्यायी मार्गे वाहतुक फिरविण्यात आली आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाला महाड पोलादपूर दरम्यानचा जवळपास 70 वर्ष जुना पूल साविञी नदीला आलेल्या पूरामुळे वाहून गेला. या पूलाचा काही भाग खचला होता, माञ त्याची पहाणी करण्यात आली नव्हती. तसेच या पूलाला पर्यायी पूल उभारण्यात येऊनही या जुन्या पूलावरुन वाहतुक सुरु होती. वाहून गेलेल्या पूलावरुन जयगड-मुंबई (MH20 BN1538) चालक - एस. एस. कांबळे, वाहक - व्ही. के. देसाई व राजापूर-बोरीवली (MH40N 9739) चालक- इ. एस. मुंढे, वाहक - पी. बी. शिर्के या दोन एस.टी. बससह इतर 8 ते 10 वाहने वाहून गेली. एस.टी. बसमध्ये 22 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. राजापूर-बोरिवली, जयगड-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी 02141-222118 किंवा 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकही मदतकार्यासाठी घटनास्थळी जमा झाले होते. माञ अंधारामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.

टॅग्स