अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

कल्याण - कल्याण-डोंबिवली परिसरात ठिकठिकाणी फिरून अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त सी. डी. राठोड यांच्या पथकाने सोमवारी (ता. १०) हातगाड्यांवर धडक कारवाई केली. शहरांत निकृष्ट दर्जाच्या अन्न पदार्थांची विक्री होत असून त्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांसह आरोग्य पथकाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई सहायक आयुक्तांनी दिले होते. याबाबतची सविस्तर बातमी रविवारी (ता. ९) दैनिक ‘सकाळ’च्या ठाणे टुडेमध्ये प्रसिद्ध होताच राठोड यांच्या पथकाने कारवाई केली.

कल्याण-डोंबिवलीत अनेक ठिकाणी दुकाने आणि हातगाड्यांवर निकृष्ट दर्जाच्या अन्न पदार्थांची विक्री होते. तक्रार करूनही अन्न व औषध ठाणे विभाग कारवाई करत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नामदेव पाटील यांच्यासह संघटनांनी केली होती. डोंबिवलीतही अंड्यांमधून प्लास्टिकसारखा पदार्थ निघाल्याचे नुकतेच उघड झाले होते. याप्रकरणी आज अन्न व औषध विभागाने डोंबिवलीसह शीळफाटा रस्त्यावरील सागर्ली, दावडी परिसरातील दुकानांना भेट दिली. मोठ्या प्रमाणावर अंड्यांची विक्री करणाऱ्यांकडून अंड्यांचे नमुने घेतले. याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वृत्तपत्राच्या रद्दीतून अन्न पदार्थ विकणाऱ्या दुकानदार आणि हातगाडीधारकांना या वेळी नोटीस बजावण्यात आली. पुन्हा अशाप्रकारे पदार्थांची विक्री करताना सापडल्यास गुन्हे दाखल करू, असा इशाराही या वेळी अन्न व औषध विभागाने दिला.