फोर्टिस रुग्णालय सोमवारी देणार उत्तर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

मुंबई - अँजिओप्लास्टी करण्यासाठी वापरण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे पुन्हा वापरण्यात येतात. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई आणि नवी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देणे शक्‍य नसल्याने रुग्णालयाने "एफडीए'कडे मुदतवाढ मागितली. त्यानुसार रुग्णालयाला सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अँजिओप्लास्टीसाठी वापरलेल्या बलून कॅथेटर आणि गायडिंग कॅथेटरचा पुन्हा दुसऱ्या रुग्णांसाठीही वापर केला जात असल्याची आणि त्याची संपूर्ण किंमतही रुग्णांच्या नातेवाइकांकडून वसूल केली जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती. मुंबईतील तीन रुग्णालयांत हा प्रकार सुरू होता. त्यानुसार "एफडीए'ने मुलुंड आणि नवी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयाला "कारणे दाखवा' नोटीस बजावली होती; मात्र फोर्टिस रुग्णालयाने नोटिशीला उत्तर देण्यास "एफडीए'कडे मुदत मागितली. त्यानुसार "एफडीए' अधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत (ता.15) उत्तर देण्यास सांगितले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून उत्तर आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल, असे "एफडीए' अधिकाऱ्याने सांगितले.