जुन्या नोटांप्रकरणी चार जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - चलनातून बाद केलेल्या दोन कोटींच्या नोटा बाळगल्याप्रकरणी एका चौकडीला बुधवारी (ता. 15) रात्री अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे दोन कोटींच्या जुन्या नोटाही जप्त करण्यात आल्या. 

मुंबई - चलनातून बाद केलेल्या दोन कोटींच्या नोटा बाळगल्याप्रकरणी एका चौकडीला बुधवारी (ता. 15) रात्री अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे दोन कोटींच्या जुन्या नोटाही जप्त करण्यात आल्या. 
खेरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोहम कदम यांच्या पथकाने बुधवारी रात्री खेरवाडीच्या शासकीय वसाहतीजवळ सापळा रचला होता. तेथे आलेल्या मोटारीची तपासणी केली असता, त्यांना दोन कोटी एक लाख 62 हजार 500 रुपयांच्या एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा आढळल्या. पोलिसांनी याप्रकरणी विनोद देसाई, सचिन सुमारिया, इमताज मुलाणी आणि सुरेश कुंभार यांना अटक केली. नोटा बदलून देण्याच्या बदल्यात आरोपींना 40 टक्के कमिशन मिळणार होते, अशी माहिती चौकशीतून उघड झाली. याप्रकरणी पोलिस आणखी एका संशयिताचा शोध घेत आहेत. आरोपींची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. 

Web Title: Four arrested in case of old notes