शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाच्या कामात गैरव्यवहार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्क मैदानाचे सुशोभीकरण, तसेच तेथील शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची दुरुस्ती होत आहे. या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खुलासा करत नसल्याचा दावा करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातील खुर्ची शिवाजी पार्कमध्ये आणून ठेवली. 

महाराष्ट्र दिनी (1 मे) शिवाजी पार्कवर दरवर्षी पोलिस संचलन होते. या संचलनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मैदानाच्या सुशोभीकरणासाठी निविदा मागवल्या आहेत. मैदानात माती टाकून सपाटीकरण करण्यासाठी 25 लाख, मैदानात शामियाना बांधण्यासाठी 19 लाख आणि शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या डागडुजीसाठी नऊ लाख रुपयांच्या कामांचा त्यात समावेश आहे. 

या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला आहे. मैदानाच्या सपाटीकरणासाठी जास्तीत जास्त पाच-सहा लाख रुपयांचा खर्च येईल, असा दावा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला. 

या निविदेबाबत माहिती मिळविण्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर सांगळे यांची भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न केला; मात्र भेटीसाठी ते वेळ देत नसल्याने त्यांची खुर्ची उचलून आणली. या निविदांबाबत खुलासा होईपर्यंत खुर्ची परत करणार नाही. 
- संदीप देशपांडे, प्रवक्ते, मनसे. 

Web Title: fraud in shivaji park work