ताज्या भाज्यांमुळे ग्राहक समाधानी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

गोरेगाव - फळ आणि पालेभाज्या शेतातून थेट मुंबईतील ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करून अखेर दिंडोशीतील आठवडे बाजार सुरू झाला. दर शुक्रवारी भरणाऱ्या या बाजारात ताजा आणि सेंद्रिय भाजीपाला मिळत असल्यामुळे अन्य भाज्यांच्या तुलनेत सारखाच भाव असला तरी ग्राहक समाधानी आहेत.

दिंडोशीतील नवीन म्हाडा वसाहतीजवळ तीन आठवड्यांपासून शुक्रवारी आठवडी बाजार भरत आहे. नरेंद्र पवार आणि अर्चना देसाई यांच्या संकल्पनेतून तो सुरू झाला. शेतमाल ताजा आणि सेंद्रिय खतांवर पिकवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधून भाजीपाला आल्यावर दर कमी होतील, असे त्यांनी सांगितले. 

राजकीय पक्षांनी दिंडोशीत स्वस्त भाजीपाला विक्री केंद्र सुरू केली होती; परंतु तेथील चढे दर होते. याशिवाय भाजीपालाही दर्जेदार नव्हता. असे काही गृहिनींनी सांगितले. मागील शुक्रवारी २० ते २२ हजार ग्राहकांनी येथे भाज्या खरेदी केल्या. नागरी निवारा, म्हाडा, रहेजा, संकल्प, संतोषनगर, शिवशाही प्रकल्पातील रहिवाशांनी खरेदी केली.

Web Title: Fresh vegetables