फुले, हार दुप्पट महागले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

नवी मुंबई - गणेशोत्सवामुळे गुरुवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याबरोबरच फुले आणि हार यांना मागणी वाढली होती. त्यामुळे त्यांच्या भावातही दुप्पट वाढ झाली आहे. 

गणेशोत्सवामुळे झेंडू, गुलछडीचे आणि मोगऱ्याचे हार, जास्वंदीचे हार, कंठी यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे एरवी दहा ते 20 रुपयांना मिळणारे साधे हार आता 20 ते 40 रुपये झाले आहेत. मोगऱ्याचे हार तर शंभराच्या घरात गेले आहेत. गुलछडी 50 रुपये झाले आहेत. जास्वंदीच्या फुलांची कंठी 50 ते 60 रुपये झाली आहे. दुर्वांपासून बनवलेली कंठी 50 रुपयांपासून सुरू होते. मोठ्या मूर्तीसाठीचे हार 500 पासून सुरू होतात. गणपतीला जास्वंदीप्रमाणे केवड्याचा फुलांनाही मान असतो. त्यामुळे केवड्याच्या एका पानासाठी 50 रुपये मोजावे लागत आहेत. 

Web Title: ganesh festival 2017 mumbai ganesh ustav flower