'गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवणार '

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

मुंबई - मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागवार कंत्राटदार नेमले आहेत. त्यांना गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. एमएमआरडीएलाही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सांगितले आहे. त्यांनी हे काम केले नाही, तर महापालिकाच खड्डे बुजवून त्याची देयके कंत्राटदार आणि एमएमआरडीकडून वसूल करेल, अशी ग्वाही आयुक्त अजोय मेहता यांनी मंगळवारी (ता. 9) दिली. गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीचे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

गणेशमूर्ती मंडपांत आणण्यास रविवारपासून (ता. 14) सुरुवात होईल. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज महापालिका मुख्यालयात महापौर आंबेकर याच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उपमहापौर अलका केरकर, सभागृहनेत्या तृष्णा विश्‍वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, माजी महापौर दत्ता दळवी, शिवसेनेचे नेते लीलाधर डाके, विनोद घोसाळकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, सरचिटणीस सुरेश सरनोबत, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, अन्य उपायुक्त आणि सहायक आयुक्त उपस्थित होते. 

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आदेश महापौर आंबेकर यांनी प्रशासनाला दिले. त्यावर महापालिका आयुक्त मेहता यांनी ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली. कंत्राटदारांनी कामे केली नाहीत, तर गणेशोत्सवापूर्वी महापालिकाच खड्डे बुजवून संबंधित कंत्राटदार आणि प्राधिकरणाकडून देयके वसूल करेल. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे‘, या लोकमान्य टिळकांच्या घोषणेला 100 वर्षे झाल्यानिमित्त सर्व गणेशोत्सव मंडळांना लोकमान्यांची छायाचित्रे देण्यात येतील, असे महापौरांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार विविध प्रकारच्या परवानग्या देण्यात येतील. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. उत्सवासाठी महापालिका सज्ज आहे.
- अजोय मेहता, आयुक्त, मुंबई महापालिका

स्वच्छता, सुरक्षेवर भर
- चौपाट्यांच्या स्वच्छतेला प्राधान्य, अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन "बीच सेफ्टी‘
- संपूर्ण मुंबईत व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम, दहा लाख घरांच्या स्वच्छतेचे उद्दिष्ट
- घरात रंगरंगोटी करताना शेजारची पाच घरे व परिसराच्या स्वच्छतेचे महापौरांचे आवाहन
- माघी गणेशोत्सवातील सहा हजार रुपये शुल्कवाढीचे परिपत्रक मागे 

मुंबई

मुंबई - महिन्यातील चौथ्या शनिवारी (ता. 24) बॅंकांचे कामकाज होणार नाही. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने आणि सोमवारी रमजान...

03.00 AM

ठाणे - पे अँड पार्किंगच्या जागेत उभ्या केलेल्या वाहनांवरही ठाणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचा धक्‍कादायक...

03.00 AM

मुंबई - राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षेत असताना राजकीय पक्षांमध्ये मात्र श्रेयवादाची लढाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत....

02.48 AM