महिलेच्या पोटात केसांचा गोळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

राजावाडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
घाटकोपर - एका महिलेच्या पोटातील केसांचा 750 ग्रॅम वजनाचा गोळा शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात राजावाडी रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले. कौटुंबिक वादामुळे मानसिक संतुलन बिघडल्याने ही महिला केस खात होती, असे स्पष्ट झाले आहे.

अंबरनाथ कावसाई रोड येथील या 20 वर्षीय महिलेला जेवणानंतर उलट्यांचा त्रास होता. त्यावर उपचार करण्यासाठी तिला आईने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यावर डॉ. भरत कामत, डॉक्‍टर प्रशांत पाटील आणि डॉक्‍टर सौरभ यांनी शनिवारी (ता.2) तिच्यावर शस्त्रक्रिया केली. तिच्या जठरातून 750 ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा बाहेर काढला. तिची प्रकृती स्थिर आहे. तिचा गेल्या वर्षी विवाह झाला होता. पती कामधंदा न करता दारूच्या व्यसनात बुडला असल्याने आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाखाची असल्याने तिला दोन वेळा जेवणही मिळत नव्हते. यामुळे मानसिक संतुलन बिघडल्याने ती डोक्‍यावरील केस उपटून गिळत होती.