लिफ्ट दुर्घटनेत मुलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुंबई - वांद्रे येथे लिफ्ट दुर्घटनेत कुनूत आरिफ जवेरी (वय 12) या मुलीचा मृत्यू झाला. निर्मलनगर पोलिसांनी याची नोंद केली आहे. लिफ्टची देखभाल न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.

वांद्रे पूर्व येथील बेहरामपाड्यातील आशियाना इमारतीत शुक्रवारी (ता. 5) ही घटना घडली. सहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या दाराजवळची काच काही महिन्यांपासून फुटली आहे. शुक्रवारी सायंकाळी कुनूत आणि तिची बहीण लिफ्टची वाट पाहत सहाव्या मजल्यावर उभ्या होत्या. लिफ्ट येत नसल्याने तिने काचेतून खाली वाकून पाहिले. तेव्हा अचानक सातव्या मजल्यावरून लिफ्ट खाली आली. तिच्या डोक्‍यावर ती आदळली. बहिणीने तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मानेला लिफ्टचा पत्रा लागल्याने ती जबर जखमी झाली होती. तिला लगेच भाभा रुग्णालयात नेण्यात आले. मानेला जबर जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला.

टॅग्स