सॅनिटरी नॅपकिन करमुक्त न करण्याच्या निर्णय निराशाजनक - शालिनी ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

गोरेगाव - सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीमुक्त न करण्याबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांचा निर्णय निराशाजनक असल्याचे मत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले. गत आठवड्यात शालिनी ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन सॅनिटरी नॅपकिन जीएसटीमुक्त करण्याची विनंती केली होती.

मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे या दीर्घ कालावधीपासून महिलांच्या विविध प्रश्नांसाठी सरकारी पातळीवर आग्रही असून समस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. दिंडोशीत महिलांसाठी शौचालयाची मोहीम सुरू करून मुंबईत अनेक ठिकाणी शौचालय उपलब्ध करून एक चळवळ उभी केली होती. त्यानंतर ठाकरे यांनी महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनबाबतही पुढाकार घेऊन एक कार्यक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत शाळा व महाविद्यालयांमध्ये निःशुल्क सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देत त्या प्रकारच्या वेंडिंग मशीन ठिकठिकाणी उपलब्ध करून दिल्या होत्या. यासाठी त्यांनी पालिका आयुक्त ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. तसेच त्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही दिल्लीला जाऊन भेट घेतली. सरकारने आमच्या विनंतीचा विचार केला नाही. ही फार निराशाजनक बाब आहे. महिलांशी संबंधित सर्व समस्या फक्त निवडणुकांसाठी केवळ एक अजेंडा बनून राहिल्याचे दिसून येत आहे. सॅनिटरी नॅपकिनबाबत न्याय मिळेल, अशी आम्हाला आशा असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.