६०० हेक्‍टरवर झोपड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई - मुंबईत १९९१ च्या विकास आराखड्यात मोकळ्या जागा म्हणून आरक्षित केलेल्या तब्बल ६०० हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या १४०० भूखंडांवर झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. प्रस्तावित विकास आराखड्यात प्रतिमाणशी चार चौरस मीटर मोकळी जागा ठेवण्याची शिफारस महापालिकेने केली आहे. यासाठी आरक्षित ठेवलेल्या बहुसंख्य भूखंडांवर अतिक्रमण असल्याने हे भूखंड नागरिकांना खुले करून देण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.

मुंबईत तब्बल १५ लाखांहून अधिक झोपड्या आहेत. या झोपड्यांनी शहरातील निम्म्यापेक्षा जास्त भाग व्यापलेला आहे. बागा, मैदाने आदी मोकळ्या जागांसाठी आरक्षित असलेल्या तब्बल ६०० हेक्‍टरहून जास्त भूखंडांवर झोपड्या आल्या आहेत. तसेच रुग्णालये, दवाखाने, शाळा, बाजार अशा विविध वापरासाठी आरक्षित ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भूखंडावरही अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे १९९१ चा विकास आराखडा २५ टक्केही यशस्वी झाला नाही. म्हणजेच त्यात विशिष्ट कारणासाठी आरक्षित असलेल्या जेमतेम २५ टक्के जागांचा उपयोग त्याच कामासाठी होऊ शकला. शिवाजीनगर, कुर्ला, मोहम्मद अली मार्ग, डोंगरी, भांडुप या भागातील ५० टक्के आरक्षित भूखंडावर अतिक्रमणे आहेत.  सध्या मुंबईतील नागरिकांच्या नशिबी प्रतिमाणशी १.२८ चौरस मीटर इतकी मोकळी जागा आली आहे. पालिका प्रशासनाने २०१४ ते २०३४ या २० वर्षांच्या प्रस्तावित विकास आराखड्यात प्रतिमाणशी सुमारे चार चौरस मीटर मोकळ्या जागेचे आरक्षण प्रस्तावित केले आहे.

आरक्षणानुसार आतापर्यंत पालिकेने ताब्यात घेतलेले भूखंड

 उद्याने : ७३.६७ हेक्‍टर
 करमणुकीची मैदाने : ९६.१४ हेक्‍टर
 खेळाची मैदाने : ७०.२३ हेक्‍टर 
प्रस्तावित  आरक्षण 

 शैक्षणिक : 
१५.९४ चौ.किमी
 वैद्यकीय : 
३.६५ चौ.किमी
 खुली जागा : 
२३.५७ चौ.किमी
 सामाजिक आरक्षण : ३.४९ चौ.किमी

Web Title: Hut on 600 hectares