पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

मुंबई : पाकिस्तानी गायक आणि कलाकारांना चित्रपटांत घेऊ नये, अशा प्रकारचा ठराव इंडियन मोशन पिक्‍चर्स असोसिएशनच्या (इम्पा) बैठकीत झाला. अंधेरी येथे ही बैठक झाली. त्या वेळी काही निर्माते उपस्थित होते.

उरी येथील हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानी कलाकारही लगेच परत गेले. या पार्श्‍वभूमीवर निर्मात्यांची संघटना असलेल्या "इम्पा'ची सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानी कलाकार व गायकांना चित्रपटात घेऊ नये, असा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.

"इम्पा'चे अध्यक्ष टी. पी. अगरवाल यांच्या "लाली की शादी में लड्डू दीवाना' या चित्रपटातील एक गाणे पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी गायलेले होते. आता हे गाणे दुसरा भारतीय गायक गाणार आहे. टी. पी. अगरवाल म्हणाले, आम्ही सर्वांनी एकमताने पाकिस्तानी गायक आणि कलाकारांना घ्यायचे नाही, असे ठरवले आहे.

मुंबई

नवी मुंबई - शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी सकाळीही कायम होता. त्यामुळे शहरातील मसाला मार्केटसह तुर्भे...

03.33 AM

मुंबई - पाहुण्यांप्रमाणे हजेरी लावून निघून जाणाऱ्या पावसाने रविवारी शहराला चांगलेच झोडपून काढले. शहरातील अनेक ठिकाणे जलमय...

03.03 AM

बेलापूर - नवी मुंबईसाठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले जाईल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 17 जूनला माजी...

02.33 AM