ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना महागाईचे चटके

पेट्रोल,डिझेल नंतर सीएनजीच्या दरवाढीमुळे आर्थिक गणित बिघडले
Inflation
InflationSakal
Summary

खाद्य तेल महागल्याने किचनचे बजेट कोलमडले, प्रवास खर्च महागला,मालवाहतुकदार संकटात

मुंबई : देशात सातत्याने इंधनाचे दर वाढत असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांनाच्या जीवनावर दिसून येत आहे. पेट्रोल,डिझेलचे वाहन परवडत नसल्याने सीएनजी वाहनाचा खप वाढू लागला मात्र आता सीएनजी वाढल्याने संपूर्ण वाहतूक क्षेत्र महागाईच्या झळा सोसत आहे. युपी निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेजच्या किमती 16 वेळा वाढल्या सोबत सीएनजी सुद्धा दोन वेळा दरवाढ झाल्याने भर उन्हाळ्यात मुंबईकरांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. दुसरीकडे खाद्य तेलाच्या दराचा भडका उडाल्याने किचनचे बजेट हाताबाहेर गेले आहे.

मालवाहतूकदार जेरीस

दुसरीकडे तर खासगी प्रवासी वाहतुकदारांनी आपल्या प्रवासी भाड्यात सुद्धा अव्वाच्या सव्वा बेकायदा भाडेवाढ केली आहे.डिझेल दरवाढ जरी झाली असली तरी अद्याप वाहतुकदाराकडून भाडेवाढ करण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. इंधन दरवाढीमुळे छोटे व्यवसायिक,मालवाहतूकदार यांचे जगणे अतिशय कठीण झालेले आहे. देशामध्ये 15 टक्के च्या आसपास मालवाहतुकीचे भाडे वाढणे अपेक्षित आहे. यामुळे महागाई वाधुण गरीब,मध्यवर्गीयाचे हाल वाढणार आहे.केंद्र व राज्य सरकार यांनी वेळीच लक्ष घालून सहानुभूतीपूर्वक वाहतूकदारांच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास भविष्यात महागाई आणखी तीव्र होण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाने व्यक्त केली आहे.

खाद्य तेलाने रडवले

इंधन दर वाढत असतांना खाद्य तेलानेही सामान्यांना रडवले आहे.जानेवारीमध्ये सूर्यफूल तेलाचा पंधरा किलोचा डबा 2350 रुपयांवरून एप्रिल महिन्यात 2700 रुपये झाला आहे. शरीराला पोषणमूल्य देणाऱ्या डाळी आणि कडधान्यांचे दर गेल्या तीन महिन्यांत दोनशे रुपये क्विंटलने आणि दोन रुपये किलोने वाढले आहेत. तूर, मूग, उडीद, हरभरा अशा विविध डाळींच्या किमती किरकोळ बाजारात तीन रुपयांनी वाढल्या आहेत. गव्हाचे दर क्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपयांनी आणि किरकोळ बाजारात तीन रुपयांनी वाढले आहेत. बासमती तांदूळ किलोमागे दहा रुपयांनी, तर कोलम तांदूळ किलोमागे दोन रुपयांनी वाढला आहे.

मुंबईचा प्रवास महागणार

सातत्याने होत असलेल्या इंधनाच्या दरवाढीमुळे आता मुंबईतील टॅक्सी-रिक्षा मेन्स युनियन पुढे आली असून, आता रिक्षाला 2 रुपये तर टॅक्सीसाठी 5 रुपयांची भाडेवाढीची मागणी करण्यात आली आहे. ऐन कोरोनाच्या काळात यापूर्वीच रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र आता आणखी रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ झाल्यास मुंबईकरांचा प्रवास सुद्धा महागण्याची शक्यता आहे.

जीवनावश्यक वस्तूही महागल्या

पेट्रोल, डिझेल सीएनजीच नाहीतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीमध्ये देखील घट झाली आहे. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यता आला. या अहवालानुसार एफएमसीजी वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण घटले आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहक वस्तूंची खरेदी कमी करत असल्याचे समोर आले आहे. जीवनावश्यक वस्तूची खरेदी कमी करण्याचे प्रमाण तमिळनाडू, आध्र प्रदेश, तेलंगना आणि कर्नाटक अशा दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राला देखील वाढत्या महागाईचा फटका बसला आहे.

डिझेलसह इतर सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे देशातील छोटे मालवाहतूकदार व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहे. देशातील तेल कंपन्या सातत्याने डिझेल दरांमध्ये वाढ करीत असल्यामुळे मालवाहतूक दार अतिशय त्रस्त झालेले असून 1 ते 5 मालवाहतूक वाहन असलेल्या छोट्या व्यवसायिकांना इंधन खर्च भागवून नफा शिल्लक राहत नाही. गेल्या दोन वर्षात वाढलेले विम्याचे दर, स्पेअर पार्ट टायर, नवीन दंड प्रणाली, टोलचे वाढते दर, यामुळे वाहतूकदारांच्या कंबरडे मोडले आहे. देशातील 85 टक्के मालवाहतूकदार हे एक ते पाच वाहनांचे मालक असून कोरोना काळापासून असलेली आर्थिक मंदी याचा फटका सहन करत असताना आता इंधनदरवाढीमुळे सुद्धा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे.

- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघ

माल वाहतुकीचा खर्च खुप जास्त वाढला आहे. खारघर ते सायन पर्यंत सामान घेऊन जाण्यासाठी आम्हाला छोट्या टेम्पोसाठी आता तीन हजार रुपये खर्च करावे लागले.यापूर्वी 1800 ते 2000 रुपये आकारले जात होते.

- आनंद रणखांबे

मुंबईतून फक्त दीडशे किलोमीटवर असणाऱ्या गावी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स 500 रुपए मोजावे लागत आहेत. खरतर या प्रवासासाठी जास्तीत जास्त 300 रुपए भाडे योग्य आहे. ग्राहकांची लूटमार सुरू आहे,आरटीओ सुस्त आहे. ट्रॅव्हर्ल्स वाल्यांच्या वसुलीवर चाप लावायला हवा.पण यांच्यावर कारवाई होतांना दिसत नाही.

- निलेश मोरे

आटो/टॅक्सिचा धंदा बुडाला

सिनजी दरवाढी मुळे रिक्षा चालक आणि टेम्पो चालक याचे अतोनात हाल होत आहे. सीएनजीच्या सतत भाव वाढीमुळे रिक्षा चालक आले मेटाकुटीला आला आहे. आज चे दार गगनाला भिडले आहेत. ज्या रिक्षा चालकाला आज हजार ते बाराशे रुपये चा धंदा करायचा म्हणजे आज कमीत कमी तीनशे रुपयांचा गॅस लागतो. त्यात जर ड्रायव्हर भाडे तत्वावर जर रिक्षा चालवत असेल तर त्यांनी त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न सध्या तरी रिक्षा चालकाचा समोर आहे.

- बाळासाहेब बांगर

आतापर्यंतचा पेट्रोल,डिझेल दरवाढीचा क्रम

तारीख - पेट्रोल - डिझेल

22 मार्च - 86 - 84

23 मार्च - 85 - 85

24 मार्च - स्थिर दर

25 मार्च - 85 - 84

26 मार्च - 85 - 84

27 मार्च - 58 - 53

28 मार्च - 37 - 32

29 मार्च - 80- 70

30 मार्च - 84 - 85

31 मार्च - 84 - 84

1 एप्रिल - स्थिर दर

2 एप्रिल - 85 - 85

3 एप्रिल - 84 - 85

4 एप्रिल - 42 - 43

5 एप्रिल - 84 - 85

6 एप्रिल - 84 - 85

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com