मल्ल्याचा ताबा मिळवणे होणार सोपे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

जूनच्या पहिल्या आठवड्यात ईडी दाखल करणार आरोपपत्र

जूनच्या पहिल्या आठवड्यात ईडी दाखल करणार आरोपपत्र
मुंबई - उद्योगपती विजय मल्ल्या प्रत्यार्पण प्रक्रियेला बळकटी मिळण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी) प्रयत्नशील असून, त्यासाठी आयडीबीआय बॅंकेच्या 900 कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडी जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याची शक्‍यता आहे. मल्ल्याविरोधात लंडनमध्ये भक्कम पुरावे उभे करण्यासाठी लवकरात लवकर हे आरोपपत्र दाखल करण्यात येईल.

आयडीबीआयचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीने गतवर्षी "मनी लॉण्डरिंग'चा गुन्हा दाखल केला होता. आता लवकरच ईडी आरोपपत्र दाखल करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मल्ल्याचे प्रत्यार्पण अधिक सोपे होण्याची शक्‍यता आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे लंडनमध्ये आपली बाजू आणखी भक्कम होण्यास मदत होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

किंगफिशर एअरलाईन्सचा मालक असलेला विजय मल्ल्या गतवर्षी 2 मार्चला लंडनला गेला होता. किंगफिशरने बॅंकांकडून घेतलेल्या नऊ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड मल्ल्याने केलेली नाही. न्यायालयाने अनेकदा मल्ल्यावर अटक वॉरंट बजावले. सीबीआयनंतर ईडीनेही गतवर्षी गुन्हा दाखल केला होता. भारत आणि ब्रिटनमध्ये 1992 मध्ये गुन्हेगार हस्तांतरण करार झाला आहे. या करारानुसार आर्थिक गुन्ह्यातील आरोपी म्हणून विजय मल्ल्याला ताब्यात द्यावे, अशी मागणी भारताने 8 फेब्रुवारीला ब्रिटन सरकारकडे केली होती. त्यानुसार 19 एप्रिलला मल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जामीन मिळाल्यानंतर आता त्याला भारतात आणण्यासाठी ईडी दाखल केलेल्या आरोपपत्राचा वापर पुरावा म्हणून करू शकते.

यापूर्वी सीबीआयने 11 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. भ्रष्टाचारविरोधी कायद्यानुसार हे आरोपपत्र होते. आता ईडीनेही आरोपपत्र दाखल केल्यानंतर भारतीय यंत्रणांची लंडनमधील बाजू आणखी भक्कम होईल, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड...

06.03 AM

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ...

03.12 AM

नवी मुंबई - राज्यात या वेळी चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पदनात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न...

02.39 AM