कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा आज मुंबईत जन-आक्रोश मोर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे आज (ता. 28) काढण्यात येणाऱ्या जन-आक्रोश मोर्चामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी होणार आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे आज (ता. 28) काढण्यात येणाऱ्या जन-आक्रोश मोर्चामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी होणार आहे.

नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस पक्षातर्फे आजचा (ता. 28) दिवस हा जन-आक्रोश दिवस म्हणून देशभर साजरा केला जाणार आहे. या दिवशी संपूर्ण देशभर मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात आक्रोश करत आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये सोमवारी (ता. 28) सकाळी 11 वाजता मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली सांताक्रूझ पूर्व येथील डॉ. आंबेडकर चौक, सीएसटी रोड, कालिना ते बांद्रा खेरवाडी जंक्‍शनदरम्यान जन-आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई कॉंग्रेसतर्फे यापूर्वी भायखळा, कुर्ला, अंधेरी आणि जोगेश्वरी आदी ठिकाणच्या बॅंकांच्या बाहेर नोटाबंदीच्या विरोधात "नोट पे चर्चा' नावाने चर्चात्मक आंदोलन केले होते आणि त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या आंदोलनाचे रूपांतर आता जन-आक्रोश मोर्चात होत आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत सरकारविरोधात आपला आक्रोश प्रकट करतील. या जण आक्रोश मोर्चाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही पाठिंबा दर्शविला आहे. धारावी, कालिना, सांताक्रूझ पूर्व व पश्‍चिम, कुर्ला, बांद्रा या विभागातील फेरीवाले व दुकानदार, व्यापाऱ्यांनी ही जन-आक्रोश मोर्चाला पाठिंबा दिला आहे, असे निरुपम यांनी सांगितले.

मुंबई

कल्याणः प्लास्टिकची अंडी, चीनी अंडी, अंडयात प्लास्टिक निघाले अशा तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. तीन ठिकणांहून...

04.45 PM

कल्याणः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर रेल्वे प्रशासन नुसार प्रत्येक रेल्वे स्थानक परिसरात 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट...

04.09 PM

मुंबादेवी : 'सकाळ'च्या प्लॅस्टिकमुक्त वसुंधरा अभियानास उमरखाडी येथे सर्व गोविंदा पथकांकडून भरघोस प्रतिसाद लाभला.येथील गणेश...

12.00 PM