जयश्री डेव्हीड यांचे भवितव्य न्यायालयाच्या हाती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

ठाणे - ठाणे पालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमधून शिवसेनेच्या उमेदवार जयश्री डेव्हीड यांच्या उमेदवारी अर्जाला अपक्ष उमेदवार किरण चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतल्यानंतरही निवडणूक विभागाने डेव्हीड यांचा अर्ज वैध ठरवल्याने चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेमुळे जयश्री डेव्हीड यांच्या उमेदवारी अर्जाचे भवितव्य आता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. 

ठाणे पालिका निवडणुकीसाठी 33 प्रभाग तयार केले आहेत. आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक पाच (ब) ही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाली होती. या जागेकरिता जयश्री डेव्हीड यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यासोबत शपथपत्र जोडले आहे. त्यामध्ये त्यांनी जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणीची पावती सादर केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार किरण चव्हाण यांनी छाननी प्रक्रियेत त्यांच्या अर्जावर आक्षेप घेत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक विभागाने त्यांचा अर्ज वैध ठरवला. त्यानंतर चव्हाण यांनी महापालिका निवडणूक अधिकारी आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन जयश्री डेव्हीड यांच्या उमेदवारी अर्जाला आव्हान दिले आहे. 

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र पडताळणीची पावती सादर करणे आवश्‍यक असते; परंतु जयश्री यांनी जात प्रमाणपत्रासंबंधीची कागदपत्रे दिली नसतानाही निवडणूक विभागाने त्यांचा अर्ज वैध ठरवला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाचा उल्लेख टाळत या प्रभागातून ठाण्यातील आमदार आणि त्यांचे समर्थक या दोघांच्या पत्नी निवडणूक लढवत असल्यामुळे निवडणूक विभाग राजकीय दबावाखाली काम करीत आहे, असा आरोप किरण चव्हाण यांनी बुधवारी (ता.8) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मुंबई

मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर लेप्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित...

12.42 PM

मुंबई : जुहू चौपाटी येथील मोरागाव येथे आज (बुधवार) सकाळी डॉल्फिनचा मृतदेह आढळून आला. किनारपट्टीच्या कचऱ्याच्या बाजूलाच...

11.36 AM

विरार - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने मॅजिक फिगर पार करून 61 जागांवर विजयी पताका फडकवली असली, तरी त्यांच्या यशात सिंहाचा...

05.24 AM