काळा घोडा महोत्सव 4 फेब्रुवारीपासून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई :  मुंबईच्या सांस्कृतिक विश्‍वात अनन्यसाधारण महत्त्व असलेला काळा घोडा महोत्सव यंदा 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. "अंतरंग' या मध्यवर्ती कल्पनेवर तो आधारित आहे. बालसाहित्य, नाटक, साहित्य, कला, खाद्य असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 

काळा घोडा बोधचिन्हात घोडा आहे. त्यामुळे यंदाच्या महोत्सवात घोड्याला केंद्रस्थानी ठेवूनच विविध उपक्रमांची सांगड घालण्यात आली आहे. त्यासाठी लहान मुलांच्या कार्यक्रमांना रॉकिंग हॉर्स, खाद्य जत्रेला हॉर्स रॅडिश, साहित्य महोत्सवाला चार्टिंग ट्रेल, रस्त्यावरील स्टॉल्सच्या विभागाला कच्ची घोडी, तर स्टॅण्ड अप कॉमेडीला हॉर्सिंग अराऊंड अशी नावे देण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांची मांडणी करण्यात आली आहे. या महोत्सवात काश्‍मिरीपासून तिबेटी फूडपर्यंत अनेक पदार्थ चाखता येतील. मुलांसाठी बालसाहित्याबरोबरच कळसूत्री बाहुल्या, नृत्य-नाट्याचे वर्कशॉप, जादू असे वेगवेगळे पर्याय ठेवण्यात आले आहेत. हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंत अनेक दुर्मीळ चित्रपट पाहता येणार असून, मराठीतील अनेक लघुपटही दाखवले जाणार आहेत.