कत्तलखान्यात येणाऱ्या जनावरांची चोरी करणारी टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कल्याण: रमझानच्या महिन्यात मांसाची मागणी वाढलेली असते. याचा फायदा घेत कत्तलखान्यात येणाऱ्या जनावरांची चोरी करणाऱ्या एक टोळी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. विषेश म्हणजे या टोळीत वीस ते पंचवीस या वयोगटातील तरुण आहेत.

खबरीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी दुर्गामाता चौकात नाकाबंदी केली होती. सकाळी सहा ते सातच्या दरम्यान एका संशयित गाडीची तपासणी केली असता त्यात दोऱ्या, जनावराच्या कत्तलीचे सामान आढळले. या गाडीत पाचजण होते. मात्र, त्यातील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. मोहम्मद नौशाद शेख, फैझान सिद्दीकी डोले (दोघेही राहणार मुंब्रा), फरहान बुबेदे (राहणार तळोजा) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तीनही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. खारघर, पनवेल तसेच रायगड परिसरातील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर जनावरे चोरीचे गुन्हे जाखल आहेत.

दरम्यान, यातील मोहम्मद नौशाद हा रायगड जिल्ह्यात पोलिसांच्या 'वॉटेंड लिस्ट'मधील आरोपी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर पोलिसांच्या अंगावर गाडी नेण्याचा गुन्हा दाखल आहे.