कल्याण रेल्वे स्थानकापासून प्री प्रेड रिक्षा, टॅक्सी सुरु होणार

रविंद्र खरात
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सुविधा ....
- आरटीओने दिलेल्या दरानुसार प्रवासी वर्गाला स्टेशन ते घरपोच आणि शहरात प्री प्रेड सेवा 
- रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा व्हाट्सऍप ग्रुप सुरु करणार यामुळे सर्वाना रिक्षा आणि रिक्षा चालकांना व्यवसाय ही मिळेल . 
- लवकरच एक हेल्पलाइन नंबर जाहिर करणार त्यामुळे प्रवासी घर बसल्या रिक्षा टॅक्सी बुक करू शकाल

कल्याण : राज्य शासनाने मागेल त्याला टॅक्सी आणि रिक्षा परमीट देण्याची घोषणा केल्याने कल्याणसह अनेक शहरात प्रवासी घेण्यावरुन वाद होण्याची शक्यता असुन तो संघर्ष टाळण्यासाठी कल्याणमधील रिक्षा संघटनांनी प्रवासी वर्गाला त्रास होवू नये म्हणून दसऱ्यापासून (30 सप्टेंबर) कल्याण रेल्वे स्थानकच्या होमप्लॅटफॉर्मच्या बाजूने प्री प्रेड रिक्षा सुरु करणार असल्याची घोषणा रिक्षा-टॅक्सी चालक मालक महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी आज केली. 

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ आज (सोमवार) रिक्षा टॅक्सी चालक मालकांची द्वार सभा झाली. यात रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या समस्या समजून घेत मार्गदर्शन करताना म्हणाले, की आता शहरात प्रवासी घेण्यावरुन संघर्ष वाढणार आहे. यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आपले वागणूकीमध्ये बदल करून प्रवासी वर्गाशी सौजन्याने वागण्याचे आवाहन केले. वाढीव भाडे घेऊ नका आदी सल्ला ही यावेळी दिला. ओला, उबेरप्रमाणे रिक्षा चालकांचा व्हाट्सऍप ग्रुप बनविला जाणार असून प्रवासी वर्गाला घरपोच सेवा देण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.

या महिन्याच्या अखेरीस शनिवार 30 सप्टेबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानकामधील होमप्लॅटफॉर्म आहे. त्याच्या बाजुच्या रिक्षा स्थानकामधून प्री प्रेड रिक्षा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी पेणकर यांनी केली. 

सुविधा ....
- आरटीओने दिलेल्या दरानुसार प्रवासी वर्गाला स्टेशन ते घरपोच आणि शहरात प्री प्रेड सेवा 
- रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा व्हाट्सऍप ग्रुप सुरु करणार यामुळे सर्वाना रिक्षा आणि रिक्षा चालकांना व्यवसाय ही मिळेल . 
- लवकरच एक हेल्पलाइन नंबर जाहिर करणार त्यामुळे प्रवासी घर बसल्या रिक्षा टॅक्सी बुक करू शकाल