दहशतवाद, नक्षलवाद मिटविण्यासाठी इतिहासातून प्रेरणा गरजेची: सौरभ करडे

Kalyan
Kalyan

कल्याण : केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून अनेक विद्यापीठ सुरू आहे, तेथून देशप्रेम आणि देशभक्तीपर संदेश आले पाहिजे मात्र तेथून देश विरोधी आणि अफजल गुरूचा उदो उदो का केला जातो हा प्रश्न पडला असून देशातील नक्षलवाद आणि दहशतवाद मिटविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातुन प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते सौरभ करडे यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमात केले.

भाजपा कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील आयोजित शिवकालीन शस्रास्रे प्रदर्शनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. यावेळी शिवकालीन किल्ले, रांगोळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला. प्रणय शेलार यांच्या शिवगर्जना संस्थेच्या प्रतिष्ठान पुरस्कृत मैदानी प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. भाला, दांड पट्टा, बाण, ढाल, तलवार, काठी आदींचा वापर करत शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी लढाई कश्या लढल्या. हे प्रात्याक्षिकेच्या माध्यमातून दाखविण्यात आले. यावेळी शिवरायांचा आठवावा प्रताप या विषयावर व्याख्याते सौरभ करडे यांचे व्याख्यान झाले. करडे यांनी प्रदर्शन आयोजन केल्याचे कौतुक करत अशी कार्यक्रम आयोजित झाल्याने लहान लहान मुलांच्या मनात शिवराय आणि त्यांचे स्वराज बाबत आकर्षण वाढेल आणि त्यांची पाऊले राज्यातील गड किल्ल्याकडे एक न एक दिवस वळतील असे मत व्यक्त केले. दरम्यान सौरभ करडे म्हणाले आज देशावर पाकिस्थान आणि चीन हे  देश विविध माध्यमातून हल्ले करत आहेत. त्याचा समाचार घेण्यास आपले सैनिक समर्थ आहे, मात्र देशाच्या अंतर्गत जो जिहादची भाषा बोलली जाते त्याचे काय त्यासाठी प्रत्येक तरुणांनी सावध राहिले पाहिजे असे करडे म्हणाले.

सर्जिकल स्ट्राईक ...
350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची बोट कापली तो सर्जिकल स्ट्राईक केला नसता तर आज देशात वेगळे वातावरण असते. लाखोच्या संख्येने सैनिक घेऊन दिल्लीहुन शाहिस्तेखान निघाला तो गाव, शहर उध्वस्त करत निघाला होता. मुगल लाखो आणि शिवाजी महाराजाकडे मूठभर मावळे, मात्र गनिमी काव्याने रात्रीच्या वेळी लालमहालात सर्जिकल स्ट्राईक करत सही सलामत शिवाजी महाराज बाहेर पडले ही हा अभिमान, हा इतिहास आजच्या विद्यार्थ्यांना का सांगितला जात असा सवाल करडे यांनी यावेळी केला.

अफजल खानाचा वध पोस्टर लावण्यास बंदी मात्र विद्यापीठ मधून अफजल गुरू, चित्रपटातून अफजल गुरू चालतो का? असा सवाल सौरभ करडे यांनी करत देशात विचित्र वातावरण असल्याचे सांगितले. देशात अतिरेकी, गुंड, गुन्हेगारी विषयावर चित्रपट बनविले जातात मात्र शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी विविध लढाई लढल्या त्यावर चित्रपट बनविण्यासाठी वेळ नसल्याची टिका यावेळी केली.

शिवाजी महाराज यांच्या काळात ही नक्षलवाद आणि दहशतवाद होता त्यांनी मूठभर मावळ्यांना घेऊन नष्ट केला होता. समुद्र मार्गे आतंकवादी येऊन आपल्या देशावर हल्ले करतात यात निष्पाप नागरीक आणि पोलीस बांधव मारले जातात. याला जबाबदार कोण? प्रत्येक चौकात, पोलीस ठाण्यासमोर शिवाजी महाराजांनी जी लढाई असो वध असो असे पोस्टर लावले पाहिजे त्यामुळे एक ऊर्जा आणि बळ तरी येईल त्या आंतकवादया विरोधात लढण्यास पोलिसांना असे परखड मत करडे यांनी व्यक्त केले.

प्रदर्शन उद्घाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तर समारोप कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी भाषणात आमदार गायकवाड म्हणाले की देशात नव्हे जगभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी केलेल्या लढाई यावर अभ्यास केला जात आहे. आपण तर पुण्यवान आहोत आपण तर त्यांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत कल्याण शहरात राहत आहोत. त्यांची आठवण आणि त्यांनी केलेले काम अश्या कार्यक्रमातून होतात. प्रदर्शन आयोजित केल्या बद्दल आयोजकांचे कौतुक यावेळी आमदार गायकवाड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आयोजक संजय मोरे, संतोष पाटील, सुभाष म्हस्के, संजय गुंजाळ, संदीप तांबे आदी मान्यवर होते तर सूत्रसंचालन व आभार नितेश म्हात्रे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com