कल्याण पूर्वमधील साकेत कॉलेजमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प

रविंद्र खरात
रविवार, 16 जुलै 2017

कल्याण पूर्वमधील साकेत कॉलेजमध्ये वाढती विजेची मागणी पाहता, कॉलेजच्या प्रशासनाने स्वतःची विजेची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या धर्तीवर 100 सोल प्लेट लावत 30 केव्ही वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभा केला आहे.

कल्याण : कल्याण पूर्व मधील विना अनुदानीत चालणाऱ्या साकेत कॉलेजच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त साधून सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 

कल्याण पूर्वमधील साकेत कॉलेजमध्ये वाढती विजेची मागणी पाहता, कॉलेजच्या प्रशासनाने स्वतःची विजेची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या धर्तीवर 100 सोल प्लेट लावत 30 केव्ही वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभा केला आहे. यामधुन विज निर्माण झाली ती कॉलेजमध्ये वापर करण्यात येणार असून उरलेली वीज महावितरणला ही देण्यात येणार असून राज्यातील साकेत कॉलेज मधील पहिला प्रकल्प असल्याचा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन 14 जुलै रोजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाचे कौतुक करत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावड़े यांच्याकडे प्रकल्पाची माहिती सांगणार असून देशात आणि राज्यात प्रत्येक शिक्षण संस्थानी प्रकल्प राबवा यासाठी मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी साकेत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद तिवारी, साकेत कुमार, अनिल तिवारी, जयेश तिवारी, विजय मिश्रा, कॉलेज प्राचार्य डॉ व्ही के मिश्रा, शोभा नायर, संजय चौधरी, ममता सिंग आदी मान्यवर होते.