शिवसैनिकांचे सोशल मीडियावर एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

रविंद्र खरात
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

सोशल मीडियाचा लोकसभा, विधानसभा, स्थानिक पातळीवरील निवडणूकीमध्ये शिवसेना भाजपा पक्षाने चांगला उपयोग केला. त्याचा उपयोग करत त्याचा फायदा ही झाला. मात्र सध्या महागाई ते एसटी संपामुळे सोशल मीडियावरील टीका पाहता शिवसैनिकानी एसटी कर्मचारी वर्गाला भावनिक आवाहन केले असून आज दिवसभर या मेसेजची चर्चा चांगली रंगली होती.

कल्याण : सलग चौथ्या दिवशी राज्यभर एसटी कर्मचारी वर्गाचा संपामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याने सर्वांचा रोष राजकीय नेते आणि मंत्री आणि सरकार प्रति निर्माण झाल्याने त्याचा फटका बसू नये म्हणून शिवसैनिकांनी एसटी कर्मचारी वर्गाला भावनिक साद सोशल मीडियावर घातली असून यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एसटी कर्मचारी सचिन आगे यांचे संभाषण व्हायरल केले आहे.

आपल्या विविध मागण्यासाठी कल्याण सहित राज्यात एसटी कर्मचारी वर्गाने ऐन दिवाळीत सोमवार मध्यरात्रीपासून संप पुकारला असून शुक्रवारी चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने राज्यभरात सर्व सामान्य नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. 

सोशल मीडियाचा लोकसभा, विधानसभा, स्थानिक पातळीवरील निवडणूकीमध्ये शिवसेना भाजपा पक्षाने चांगला उपयोग केला. त्याचा उपयोग करत त्याचा फायदा ही झाला. मात्र सध्या महागाई ते एसटी संपामुळे सोशल मीडियावरील टीका पाहता शिवसैनिकानी एसटी कर्मचारी वर्गाला भावनिक आवाहन केले असून आज दिवसभर या मेसेजची चर्चा चांगली रंगली होती.

सोशल मीडियावरील मेसेज ...
याला म्हणतात बोलायची पध्द्त उद्धव साहेब इतके मोठे व्यक्ती असून पण एक सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत किती नम्र पणे बोलता आहेत.

गेवराई आगाराचा कर्मचारी सचिन आगे यांनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी एसटी संपाबाबत फोनवर कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. एसटी कर्मचारी संपाबाबत जे दिवाकर रावते यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. त्यांनी आधी एसटीची आर्थिक स्थिती जाणून घ्यावी.एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या अवाढव्य आहेत आणि त्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत मान्य न करण्यासारख्याच आहेत.उगाच कामगारांना खोटी आश्वासने देऊन त्यांचा विश्वासघात करणे हे शिवसेना आणि शिवसेना मंत्र्यांच्या रक्तात नाही. त्यामुळेच यावर तोडगा काढायला वेळ होतो आहे. खोटी आश्वासनदेऊन जनतेला कसं फसवता येते हे भाजपच्या भूमिकेतून समजून येत आहे. त्यामुळे एसटी कामगारांनीच आता योग्य तोडगा काढावा आणि ज्या तडजोड शासनाने मान्य केल्या आहेत त्यावर समाधान मानून संप मागे घ्यावा. आणि जनतेच्या अविरत सेवेसाठी कामावर रुजू व्हावे ही विनंती.

सोशल मीडियावर जरी सत्ता भाजपा शिवसेनेची असली तरी भाजपावर टिका करण्याची संधी सोडली नाही, मात्र या भावनिक सादला एसटी कर्मचारी संघटना आणि कर्मचारी ऐकतात का याकडे लक्ष्य लागले आहे.