जिवंत अर्भकाला गटारात फेकून महिला फरार

मयुरी चव्हाण काकडे
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

या परिसरात राहणाऱ्या एका जागरूक नागरिकाला लहान बाळ रडण्याचा आवाज आला. अर्भक नजरेस पडल्यावर नागरिकाने या घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. पुरूष जातीच्या या बाळाला ताब्यात घेऊन पोलिसांनी उपचारासाठी पालिकेच्या रूख्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले.

कल्याण : कल्याण पूर्वेकडील कैलासनगर येथील उघड्या गटारात मंगळवारी संध्याकाळी नवजात जिवंत अर्भक आढळल्याची घटना घडली आहे.

या परिसरात राहणाऱ्या एका जागरूक नागरिकाला लहान बाळ रडण्याचा आवाज आला. अर्भक नजरेस पडल्यावर नागरिकाने या घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. पुरूष जातीच्या या बाळाला ताब्यात घेऊन पोलिसांनी उपचारासाठी पालिकेच्या रूख्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले.

गटारात मोठ्या प्रमाणात रक्ताचे थारोळे साचले असल्याने हे अर्भक नुकतेच जन्मले असून अज्ञात महिलेने आपले अस्तित्व लपविण्यासाठी जन्म देताच या बाळाला गटारात फेकून दिले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स