कल्याण -  शहरातील मुजोर रिक्षा चालकाविरोधात कारवाई करा

kalyan
kalyan

कल्याण - कल्याण वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी आशा गावंड यांनी लायसन्स मागितले म्हणून रिक्षा चालक नागेश अवलगिरी याने फरपटत नेल्याच्या घटनेचे पडसाद शहरात पडत आहेत. आज गुरुवार ता 11 रोजी कल्याण डोंबिवली महिला कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षा सारीका आणि त्यांच्या पदाधिकारी वर्गाने वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दिपक बांदेकर यांची भेट घेत मुजोर रिक्षा चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

मंगळवार ता 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता कल्याण पश्चिम दिपक हॉटेल परिसरात वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचारी आशा गावंड या ड्युटीवर असताना रिक्षा चालक नागेश आवलगिरी याच्याकडे लायसन्स मागितले असता त्याने लायसन्स न देता पळ काढण्याचा प्रयन्त केला. यावेळी महिला पोलिस कर्मचारी हिने रिक्षा रोखून ठेवली, भरधाव रिक्षा चालकाने महिला पोलिस कर्मचारीला फरपटत नेले. या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण पसरले आहे. 

निवेदन देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रेखा सोनावणे, मीनाक्षी आहेर, मनीषा बाळसराफ, पूजा पाटील, राजश्री वानखडे, शरद गवळी, हेमंत यादगिरे, संदीप देसाई, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, सुभाष गायकवाड उपस्थित होते. यावेळी पोलिस आयुक्त दिपक बांदेकर यांची भेट घेत दादागिरी आणि मुजोर रिक्षाचालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी रिक्षा चालकाविरोधात कारवाई लवकरच हाती घेण्याचे सहायक पोलिस आयुक्त दिपक बांदेकर यांनी आश्वासन तक्रारदारांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com