चालकाच्या प्रसंगावधानाने 16 प्रवाशांचे प्राण वाचले

चालकाच्या प्रसंगावधानाने 16 प्रवाशांचे प्राण वाचले

खालापूर - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत मिनी बस खाक झाली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना गाडीतून उतरविल्याने 16 प्रवाशांचे प्राण वाचले. पुण्याकडे जात असताना रात्री साडेआठच्या सुमारास बसने घाटाचा पल्ला पार केला.

त्यानंतर अचानक बसमधील इंजिनमधून धूर येण्यास सुरवात झाल्यामुळे चालकाने बाजूपट्टीवर बस थांबविली. त्याच वेळी सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. बसमधील सर्व 16 प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळानंतर बसने पेट घेतला. या घटनेची माहिती आयआरबीच्या डेल्टा फोर्स व देवदूत पथकाला समजल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने सुमारे 25 मिनिटांत आग विझविण्यात यश मिळविले. आग पूर्ण आटोक्‍यात येईपर्यंत पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. 15 दिवसांत द्रुतगती मार्गावर वाहनाला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com