मोनार्च बिल्डर्सच्या दोन संचालकांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

खारघर - गाळा खरेदी व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी मोनार्च बिल्डर्सचे संचालक गोपाळ ठाकूर आणि हसमुख ठाकूर यांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी इतर चार संचालक आणि इस्टेट एजंटचा शोध सुरू आहे.

खारघर - गाळा खरेदी व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी मोनार्च बिल्डर्सचे संचालक गोपाळ ठाकूर आणि हसमुख ठाकूर यांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी इतर चार संचालक आणि इस्टेट एजंटचा शोध सुरू आहे.

खारघर सेक्‍टर 17 मध्ये राहणारे नरसिंह गोपाळ राठोड यांनी गेल्या वर्षी खारघरमधील नितीन खांदारे या इस्टेट एजंटच्या माध्यमातून सेक्‍टर-18 मधील मोनार्च बिल्डर्सच्या लक्‍झुरिया अपार्टमेंटमध्ये 11 क्रमांकाचा गाळा खरेदीचा व्यवहार केला. यासाठी मोनार्च बिल्डर्सला धनादेश व रोख असे एकूण 46 लाख रुपये दिले होते; मात्र मोनार्च बिल्डर्सकडून त्यांना हा गाळा देण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे राठोड यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. पैसेही मिळत नसल्याचे लक्षात येताच एप्रिलमध्ये राठोड यांनी तक्रार दाखल केली होती.