शिर्डीच्या खासदारपुत्राची खालापुरात दादागिरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

खोपोली - पाली फाटा येथे चिकन विक्रेते आणि सलून दुकानांवर काही दिवसांपूर्वी रात्री बुलडोझर फिरवून जागा सपाट केल्याची तक्रार स्थानिक व्यावसायिकांनी खोपोली पोलिस ठाण्यात केली आहे. या जागेवर मातीचा भराव टाकून तत्काळ लोखंडी जाळी लावून कूंपण तयार केले असून, दुकानदारांनी तक्रारीत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांच्यावर आरोप केला आहे.

खालापूर तालुक्‍यातील देवन्हावे ग्रामपंचायत हद्दीतील पाली फाटा येथे स्वाती नारायण भोपतराव यांची त्यांच्या मालकीची एक गुंठा जमीन आहे. त्यामध्ये हॉटेल व्यवसाय, सलून दुकान आणि चिकन विक्रेत्यांची दुकाने आहेत. या जमिनीला लागूनच प्रशांत लोखंडे यांची दीड एकर जमीन आहे. 2 फेब्रुवारीला बाजूच्या जमिनीवरील दुकाने बुलडोझरने तोडून तेथे भराव टाकून सपाटीकरण करण्यात आले. तसेच त्याभोवती लोखंडी जाळीचे कूंपण तयार केल्याची तक्रार स्वाती भोपतराव यांनी खोपोली पोलिस ठाण्यात दिली आहे.

प्रशांत लोखंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या प्रतिनिधींना याविषयी विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला; तर काही स्थानिक सामंजस्याने हा विषय सोडवण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान, जमीनमालक स्वाती भोपतराव यांनी न्याय न मिळाल्यास कायदेशीर लढा देण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: khopoli news mumbai news crime pressure prashant lokhande