चार दरोडेखोर रायगडमध्ये जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

अलिबाग - कर्जत, खोपोली, पाली, माणगाव, पोलादपूर येथे नागरिकांना लुटणाऱ्या चार दरोडेखोरांना रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. मुख्य आरोपी वसीम सिराज अब्बास (रा. मुंब्रा), जयकुमार रजत, इरफान खान (दोघे मध्य प्रदेश) आणि ध्रुवकुमार त्रिपाठी (उत्तर प्रदेश) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार, स्कूटर असा तीन लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी मंगळवारी (ता. 18) पत्रकार परिषद घेऊन कारवाईविषयी माहिती दिली. ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रीकरणावरून आरोपींपर्यंत पोचण्यात गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. रायगडसह राज्यभरात 21 ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.