लेप्टो-डेंगी डोके वर काढतोय! 

लेप्टो-डेंगी डोके वर काढतोय! 

मुंबई - सप्टेंबर महिन्यात डेंगी आणि लेप्टोमुळे दोन जणांना जीव गमवावा लागला. त्यातच पावसाचे बरसणे पुन्हा सुरू झाल्याने साथरोगांबरोबरच डेंगीचे रुग्णही वाढत चालले असल्याचा निष्कर्ष डॉक्‍टरांनी काढला आहे. हवामानातील बदलामुळे आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांतील धुळीमुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले असून छोट्या-मोठ्या दवाखान्यांत त्यांची गर्दी होत आहे. 

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील साथीच्या रोगांची माहिती आज पालिका आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली. उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या 46 वर्षांच्या महिलेचा डेंगीमुळे मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वीच ती मालाडमध्ये आली होती. ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत असल्याने तिने लगेच खासगी रुग्णालय गाठले. उपचारानंतर तिने रुग्णालयातून स्वतःहूनच लवकर डिस्चार्ज घेतला. नंतर त्रास वाढल्याने 1 सप्टेंबरला तिने पालिका रुग्णालय गाठले; परंतु दोन तासांतच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंधेरी पश्‍चिमेतील तापाने हैराण झालेला 37 वर्षीय अत्यवस्थ रुग्ण 4 सप्टेंबर रोजी पालिका रुग्णालयात आला. त्याच्यावर डॉक्‍टरांनी त्वरित उपचारही सुरू केले; पण दोन दिवसांनंतर एक एक अवयव निकामी होत त्याचा मृत्यू झाला. 

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मलेरियाचे तब्बल 307 रुग्ण पालिका आरोग्य विभागाला आढळून आले. डेंगीच्या रुग्णांची संख्याही 213 वर पोहोचली आहे; मात्र गणेशोत्सवादरम्यान पावसाचा जोर हळूहळू वाढत असल्याने डेंगी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, अशी माहिती फिजिशियन डॉ. सुहास पिंगळे यांनी दिली. सप्टेंबरमध्ये मुंबईत 19 डेंगीचे नवे रुग्ण आढळले. तो आकडा आता वाढला असण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. 

भर उन्हात अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे सर्दी-खोकल्यानेही मुंबईकर आजारी आहेत. तापाचे रुग्णही दर दिवशी वाढत असल्याची माहिती फिजिशियन सी. शाह यांनी दिली. संभाव्य आजाराची शक्‍यता लक्षात घेत पावसात भिजल्यानंतर त्वरित ओले कपडे बदलण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. 

आजारी रुग्णांची संख्या (1 ते 16 सप्टेंबर 2018) 
- मलेरिया - 307 
- लेप्टो -19 
- डेंगी - 213 
- गॅस्ट्रो - 227 
- हेपेटायटिस - 68 
- कॉलरा - 1 

डेंगीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना 
- घरातील पाण्याचा साठा झाकून ठेवा 
- फुलदाणी व कुंड्यांतील पाणी बदलत राहा 
- टाकाऊ वस्तूंची त्वरित विल्हेवाट लावा 

लेप्टोसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना 
- साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे 
- पाण्याचा निचरा करून परिसर स्वच्छ ठेवा 
- उंदीर-घुशींचा नायनाट करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com