मधुरांगणतर्फे "ह्या गोजिरवाण्या घरात' नाटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

ठाणे - वेद प्रॉडक्‍शन निर्मित आणि मुक्तायन प्रस्तुत "ह्या गोजिरवाण्या घरात' कौटुंबिक नाटक रंगभूमीवर दाखल झाले असून, सकाळ मधुरांगणच्या वतीने ते ठाण्यात येत आहेत. 

"सकाळ' मधुरांगणच्या वतीने हे नाटक सोमवारी (ता. 9) गडकरी रंगायतन येथे रात्री 8.30 वाजता होणार आहे. त्यासाठी मधुरांगणच्या सभासद महिलांसाठी देण्यात येणाऱ्या प्रवेशिका ठाणे सकाळ कार्यालयात व गडकरी रंगायतन येथे उपलब्ध आहेत. महिलांनी मधुरांगण सभासद ओळखपत्र दाखवून प्रवेशिका घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशिका मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. 

मानस लयाळ लिखित या नाटकामध्ये सुप्रिया पाठारे, साईकीत कामत व अदिती द्रविड हे तीन कलाकार मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. छोटा पडदा गाजवणारे हे तिन्ही कलाकार "ह्या गोजिरवाण्या घरात' या नाटकाच्या माध्यमातून प्रथमच एकत्र रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. 

"रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून नावारूपास आलेला अभिराम म्हणजेच साईकीत कामत आजही लोकांच्या स्मरणात आहे. तर "माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अदिती सर्वांना दिसत आहे. सुप्रिया पाठारे या सर्वपरिचित आहेतच. हे नाटक कौटुंबिक जरी असले तरी त्यात साई-पियूष या जोडीने सुरेख संगीताचा संगमही पाहायला मिळणार आहे. 

काय आहे नाटकात? 
नवरा, बायको व आई अशा तिघांच्या संसारात आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला हवी असलेली स्वतःची स्पेस व त्यामुळे वाढणारा नात्यातला गोडवा हे या नाटकाचे प्रमुख सार आहे. अंकुर काकतकर दिग्दर्शित या नाटकाचे गोपाल अलगेरी व तनुजा कुलकर्णी हे निर्माते असून, योगिता औरादकर या सहनिर्मात्या आहेत.

टॅग्स

मुंबई

कल्याण : उद्या 25 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे, त्यापूर्वी गणेशोत्सव काळात लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आणि...

02.24 PM

सैनिक हो तुमच्या साठी... च्या गिताने उपस्थितांच्या चेहऱ्यावर ओघळले अश्रू मुंबई : वर्षभर आपले कुटुंबिय आणि देशासाठी लढणाऱ्या...

01.24 PM

मुंबई - अकार्यक्षम ठरलेल्या "बेस्ट'च्या 550 बस वर्षभरात भंगारात काढल्यानंतर आता 453 बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट...

04.24 AM