मध्य रेल्वे कोलमडली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

मुंबई : मध्य रेल्वेवरील टिटवाळा-आंबिवली स्थानकांदरम्यान शनिवारी पहाटे ओव्हरहेड वायर तुटली.

यामुळे एक्‍स्प्रेस गाड्यांसह लोकल सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले. या घटनेनंतर ट्रान्स हार्बर मार्गावर कोपरखैरणे आणि घणसोली स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने ठाणे-वाशी मार्गावरील वाहतूक खोळंबली. या दोन्ही घटनांमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे खूप हाल झाले. या गोंधळामुळे मुख्य मार्गावरील 30 लोकल, तर ट्रान्स हार्बरवरील 3 फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर बिघाडाचे प्रकार सुरूच आहेत. ठाणे स्थानकात ओव्हरहेड वायरमधून धूर येण्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पहाटे 4.49च्या सुमारास टिटवाळा-आंबिवली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. टिटवाळ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीचा पेण्टोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने ही दुर्घटना घडली. पहाटे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या मुंबईत येत असतानाच, ही घटना घडल्याने या गाड्या इगतपुरी ते टिटवाळा स्थानकांदरम्यान रखडल्या. मुंबईहून जाणाऱ्या गाड्यांनाही याचा फटका बसला. ओव्हरहेड वायर जोडण्यासाठी या मार्गावरील विद्युतपुरवठा काही वेळ बंद करण्यात आल्याने टिटवाळा लोकल आणि त्यापुढे थांबलेली हावडा-एलटीटी एक्‍स्प्रेस डिझेल इंजिनाने खेचून आणण्यात आली.

सकाळी 11 वाजेपर्यंत ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम सुरू होते. या वेळेत दोन्ही मार्गांवरील 30 लोकल रद्द करण्यात आल्या. काही गाड्या कल्याण स्थानकापर्यंतच चालवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे असह्य हाल झाले. प्रवाशांच्या सोईसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण ते टिटवाळा दरम्यान 12 विशेष बस चालवल्या. ओव्हरहेड वायर दुरुस्त झाल्यानंतर मेल, एक्‍स्प्रेस मुंबईत येऊ लागल्या; मात्र जलद लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली. रात्री उशिरापर्यंत या मार्गावरील लोकल उशिरा धावत होत्या.

ट्रान्स हार्बर मार्गावर कोपरखैरणे ते घणसोली स्थानकांदरम्यान सकाळी 8.30च्या सुमारास रुळाला तडा गेला. यामुळे या मार्गावरील लोकल सेवा विस्कळित झाल्याने तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. अनेक लोकल उशिरा धावत होत्या. सकाळी 11 नंतर वाहतूक सुरू झाली.

Web Title: Madhya Railway service collapse