शहा, उद्धव, फडणवीस भेट; पण राष्ट्रपतिपदाबाबत निर्णय नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बैठकीतून वगळण्यात आलं होतं. रावसाहेब दानवेंना बैठकीच्या बाहेरच बसवलं. त्यांना बैठकीत घेतलं नाही. शेतकऱ्यांसदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे दानवेंना या बैठकीतून वगळल्याची सूत्रांनी माहिती दिली.

मुंबई : सतेत असूनही शेतकरी आंदोलनासह विविध मुद्द्यांवर सातत्याने विरोधकांची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अमित शहा यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आज भेट घेतली. 'मातोश्री' या ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दली.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत किंवा
एम.एस. स्वामिनाथन यांना उमेदवारी द्यावी यासाठी त्यांच्या नावावर शिवसेना ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बैठकीतून वगळण्यात आलं होतं. रावसाहेब दानवेंना बैठकीच्या बाहेरच बसवलं. त्यांना बैठकीत घेतलं नाही. शेतकऱ्यांसदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे दानवेंना या बैठकीतून वगळल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सकाळी पोचले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मातोश्रीमधील वरच्या मजल्यावर बैठक झाली. मात्र, या बैठकीत काहीही निष्पन्न न झाल्याचे सांगण्यात आले.