महाराष्ट्रातील ट्रेलरची नागालँडमध्ये नोंदणी करून वापर

Maharashtra news in Marathi Mumbai News RTO Malpractices
Maharashtra news in Marathi Mumbai News RTO Malpractices

ठाणे : महाराष्ट्रात पाच वर्षे वापरल्यानंतरही त्याच्या रोड टॅक्‍सची थकबाकी चुकवण्यासाठी या ट्रकच्या चेसीस नंबर व इंजिन नंबरमध्ये छेडछाड करून त्यावर नवे नंबर टाकून नागालँड आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंदणी करून नवी मुंबईमध्ये व्यवसाय करणाऱ्या आरोपीस ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजेंद्र प्रतमसिंग विलखू (वय 65) असे त्याचे नाव असून तो नवी मुंबई परिसरातील कळंबोली सेक्‍टर 11 मध्ये ईव्हीओम या इमारतीमध्ये ए विंगमध्ये 402 नंबरच्या घरात राहत होता. सध्या तो अशाच महाराष्ट्रात वापरलेल्या ट्रेलरची छेडछाड करून त्याचा वापर करत असताना ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याच्या मालकीची एकूण 12 वाहने असून त्यापैकी सहा वाहनांमध्ये अशी अफरातफर केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. 

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला खबऱ्याकडून राजेंद्रसिंग विलखू याची माहिती मिळाली होती. त्याने एल ऍण्ड टी फायनान्स, बेलापूर येथून खरेदी केलेला ट्रेलर महाराष्ट्रात पाच वर्षे वापरून ट्रेलरचा थकलेला रोड टॅक्‍स वाचवण्यासाठी ट्रेलरच्या चेसिस नंबर आणि इंजिन नंबरमध्ये छेडछाड करून त्यावर नवीन चेसिस व इंजिन नंबर टाकला. नागालॅंड येथील आर.टी.ओ. कार्यालयातून तेथील स्थानिक एजंटच्या माध्यमातून खोटी कागदपत्रे तयार करून नव्या नंबर प्लेट बसवून तो ट्रेलरचा व्यवसाय करत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार मंगळवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाने ठाण्यातील पारसिक नाका येथील रेतीबंदर सर्कल येथून राजेंद्रसिंग यास अटक केली. त्याचा ट्रकही जप्त करण्यात आला आहे. 

ग्रॅन्डरच्या सहाय्याने नंबरमध्ये बदल 
जुन्या वापरलेल्या तसेच विकत घेतलेल्या वाहनांचे चेसिस नंबर व इंजिन नंबर ग्रॅन्डरच्या सहाय्याने घासून त्या ठिकाणी इतर गाड्यांचे चेसिस नंबर व इंजिन नंबर पंचिंग करण्यात येत होते. त्यानंतर नागालॅंडमधील एजन्टकडून खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने नवा क्रमांक मिळवून तो ट्रकवर लावून व्यवसाय केला जात होता. या व्यक्तीने आतापर्यंत सहा ट्रकच्या चेसिस आणि इंजिन नंबरमध्ये अफरातफर करून नागालॅंड आणि पंजाब आरटीओची बनावट कागदपत्रे तयार करून ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय केला. सहा ट्रेलरची चोरी करून त्यांचीही विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस आयुक्त परमबीरसिंग, पोलिस सह आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, पोलिस उपायुक्त सुनील भारद्वाज, सहायक पोलिस आयुक्त मधुकर हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलिस निरीक्षक रणबीर बयेस, सहपोलिस निरीक्षक संदीप बागुल आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com