मराठा आरक्षणाबाबत भाजपत खल

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण कसे द्यावे, याबाबत भाजपत खल सुरू आहे. महाराष्ट्रातील महामोर्चांची दखल घेत या समाजाला नेमके काय हवे आहे, याचा शोध घेण्यासाठी अंतर्गत मंथन सुरू आहे. आरक्षणाचा निर्णय झाला तर त्यासंबंधात तिजोरीवर किती ताण येईल, असा निधी खर्च केला तर अन्य समाज त्याबाबत कोणती प्रतिक्रिया देतील याचाही विचार सध्या करण्यात येत आहे.

मराठा समाजातील नेत्यांशी संपर्क साधणे, त्यांच्या मागण्या समजून घेणे, तसेच त्यांना चर्चेसाठी हजर करणे या विषयांवर सध्या भाजपचे नेते चर्चा करीत आहेत. महसूल, समाजकल्याण तसेच गृह खात्याशी यासंबंधात संपर्क साधला जात आहे. मराठा समाजातील उतरंडीवर असलेल्या जनतेला आरक्षण मिळावे, असा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी शैक्षणिक आरक्षणाचा निकष लावता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.