वाड्यात निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

Wada
Wada


वाडा : वाडा नगरपंचायत निवडणूकी करिता मतदान उद्या बुधवारी (दि.13) होत असल्याने मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्वच राजकीय  पक्षांचा  सुरू असलेला प्रचार थंडावला. तर निवडणूकीकरीता 17 प्रभागांमध्ये शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. वाड्यात उद्या मतदान होत असून नगराध्यक्ष पदासाठी थेट मतदान होणार आहे. नगराध्यक्ष पदाकरिता एकूण पाच उमेदवार रिंगणात असून नगरसेवक पदाच्या सतरा प्रभागांमध्ये एकूण 79 उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत. निवडणूकीच्या प्रचाराची मुदत आज संपत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उघडपणे प्रचार थांबवला आहे. त्याचप्रमाणे जागोजागी लागलेले  उमेदवाराचे फलकही राजकीय पक्षांनी आचारसंहिता पाळत स्वतःहून उतरवले आहेत. तर निवडणूक निर्णय अधिकारी मोहन नळंदकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्यक्ष मतदानाकरिता मतदान केंद्रावर 129 एवढे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचा-यांना मतदानासाठी  आवश्यक असणारे मतदार यंत्र व अन्य साहित्याचे वाटप आज तहसील कार्यालयात करण्यात आले असून कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. मतदाना दरम्यान कायदा व सुव्यवस्था  राखली जावी म्हणून  पोलीस प्रशासनाने दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या व 68 पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे.

निकालाची प्रतिक्षा 18 डिसेंबरपर्यंत -
वाडा नगरपंचायत निवडणूकीची 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र डहाणू व जव्हार येथील निवडणूका   पुढे ढकलल्याने येथील मतदान 17 डिसेंबरला होत आहे. त्यामुळे त्या निवडणुकीवर वाड्याच्या निकालाचा परिणाम होऊ नये म्हणून वाडा नगरपंचायतीची  मतमोजणी निवडणूक आयोगाने 18 डिसेंबरला जाहीर केली. वाड्याच्या निकालाचा परिणाम होऊ नये म्हणून वाडा नगरपंचायतीची मतमोजणी निवडणूक  आयोगाने 18 डिसेंबरला करण्याचे आदेश पारित केल्याने आता मतदारांना निकालाची प्रतिक्षा 18 डिसेंबरपर्यंत करावी लागणार आहे. 

पोलिसांचे संचलन -
बुधवारी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये अधिक जागृती व्हावी म्हणून व कोठेही निवडणूक काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाडा पोलिसांनी संपूर्ण शहरात दंगलविरोधी पथक व स्थानिक पोलीस कर्मचा-यांनी संपूर्ण शहरात संचलन केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com