मुंबईत बोन मॅरो प्रत्यारोपण होणार मोफत 

bone-marrow
bone-marrow

मुंबई - बोरीवली येथी स्टेट ऑफ द आर्ट थॅलेसेमिया केअर, पेडिअॅट्रीक हेमॅटॉलॉजी, ऑन्कोलॉजी अॅण्ड बीएमटी रुग्णालयात लहान मुलांकरीता मोफत बोन मॅरो प्रत्यारोपण सुविधा उपलबद्ध होणार असून, 15 मुलांची यासाठी निवड झाली आहे. त्यांच्याशी जुळणारा दाता मिळाल्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. 

रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये सुमारे 1573 रुग्ण तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 1283 थॅलेसेमिया, 94 रक्तकर्करोगाचे आणि 196 रक्तदोष असलेले रुग्ण आढळले आहेत. रुग्णालयात आढळलेल्या 1573 रुग्णांपैकी 579 नवीन रुग्ण आहेत तर, 994 फॉलोअपसाठी येणारे रुग्ण आहेत. थॅलेसेमिया (मेजर) झालेलेल्या रुग्णांसाठी बोन मॅरो प्रत्यारोपण हा एक खात्रीशीर पर्याय आहे. अनेक रुग्ण येणाऱ्या खर्चाच्या विचारापायी उपचार घेत नाहीत किंवा उपचार अर्ध्यावरच सोडतात. गरीब मुलांना उपचार मिळावेत यासाठी सेंटरमध्ये मोफत बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती थिंक फाउंडेशनचे विनय शेट्टी यांनी दिली. यासाठी रुग्णांना मदत करणाऱ्या संस्था आणि चॅरिटेबल ट्रस्टची मदत घेण्यात येणार आहे. बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यापूर्वी जुळणारा दाता मिळावा यासाठी होणारी चाचणीदेखील मोफत होणार आहे. या प्रत्येक चाचणीसाठी सुमारे 15 हजार रुपये खर्च येतो. रक्तगट जुळणारा दाता मिळेपर्यंत ही चाचणी करावी लागते असे शेट्टी म्हणाले.  

रुग्णालयाने सध्या 15 मुलांची नोंद बोन मॅरो शस्त्रक्रियेसाठी केली आहे. या मुलांना रक्तगटाला जुळणारा दाता उपलबद्ध झाल्यावर शस्त्रक्रिया होईल. गरजू कर्करुग्ण, थॅलेसेमिया आणि इतर रक्तदोष असलेल्या रुग्णांना मोफत बोन मॅरो प्रत्यारोपण करता यावे हे माझे स्वप्न असून, ते आता पूर्ण होणार आहे अशी प्रतिक्रिया रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. ममता मंगलानी यांनी दिली. 

मुंबईत लोकमान्य टिळक रुग्णालय (सायन) आणि टाटा कर्करोग रुग्णालयात बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येते. स्टेट ऑफ द आर्ट थॅलेसेमिया केअर, पेडिअॅट्रीक हेमॅटॉलॉजी, ऑन्कोलॉजी अॅण्ड बीएमटी रुग्णालयात उपचार सुरू झाल्यास थॅलेसेमिया झालेल्या बालकांप्रमाणे कर्करोग झालेल्या बालाकांनाही दिलासा मिळणार आहे. रुग्णालयात सध्या कर्करुग्ण बालकांसाठी 6 खाटा आहेत. टाटा कर्करोग रुग्णालयातून सुचविलेल्या रुग्णांना इथे उपचार दिले जातात. 

थॅलेसेमिया एकूण रुग्ण  
मुंबई - 2200
महाराष्ट्र - 6500 

रुग्णालयात आलेले रुग्ण (17 एप्रिल 2017 ते 16 फेब्रुवारी 2018)

   नवीन रुग्ण   फॉलोअप सुरू असलेले रुग्ण 
थॅलेसेमिया  450   833
कर्करुग्ण   52   42
इतर रक्तदोष 77 119

                   
                                        
                              

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com