चौथ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू 

चौथ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू 

मुंबई - इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.22) रात्री अंधेरीत घडली. तुषार व्हावळ (20) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अंधेरीतील सात बंगला परिसरात राहणारा तुषार आयटीचे शिक्षण घेत होता. तो गुरुवारी रात्री डी. एन.नगर येथील अष्टविनायक सोसायटीत राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी दोन मित्रांसह आला होता. गप्पा मारण्यासाठी चौघे मित्र इमारतीच्या चौथ्या मजल्यावर बसले होते. काही वेळाने तेथील 

मोकळ्या जागेतून दुसऱ्या इमारतीत जात असताना अंधारामुळे तुषारला वाटेतील पत्रा दिसला नाही. पत्र्यावर पाय ठेवल्यामुळे तो कोसळला. तुषारच्या मित्रांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी पंचनामा करून तुषारचा मृतदेह विच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तुषारच्या तीन मित्रांची चौकशीही केल्याचे समजते. तुषारच्या नातेवाईकांचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर तुषारच्या मृत्यूचे निश्‍चित कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com