kalyan
kalyan

कल्याणमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकमालकांचे आंदोलन तूर्त मागे

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रेल्वेच्या हद्दीत असलेल्या रिक्षा टॅक्सी स्थानकातील अंतर्गत रस्ता दुरुस्तीची कामे आगामी दहा दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन रेल्वे अधिकारी वर्गाने दिल्याने मंगळवारी होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती रिक्षा टॅक्सी चालकमालक असोशिएशनचे अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी 'सकाळ'ला दिली . 

कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानकाच्या बाहेर रेल्वेच्या हद्दीत टॅक्सी आणि रिक्षा स्थानक आहे. कल्याण पश्चिम सोबत कल्याण पूर्व मध्ये गणपती चौक, सिद्धार्थनगर रिक्षा टॅक्सी स्थानका अंतर्गत रस्ते दुरुस्ती बाबत रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करून ही प्रशासनाने दुर्लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ मंगळवार ता 19 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रिक्षा टॅक्सी चालक मालक असोशिएशनचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रिक्षा टॅक्सी चालक मालक यांचा मोर्चा कल्याण पश्चिम रिक्षा स्थानक ते कल्याण पूर्व रेल्वे स्थानक असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता .

याधर्तीवर रेल्वे पोलीस आणि सुरक्षा बलाच्या मध्यस्थीमुळे आज सोमवार ता 18 डिसेंबर रोजी सकाळी कल्याण पूर्व मधील मध्य रेल्वे च्या सहायक मंडल इंजिनियर कार्यालय मधील वरीष्ठ अभियंता  व्ही व्ही सतीशन यांच्या दालनात महत्वपूर्ण मिटींग झाली.

यात रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर पिंगळे , सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित माने , रिक्षा टॅक्सी चालक मालक असोशिएशनचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांच्यासमवेत विलास वैद्य , जॉन कॅलिमिनो , सुबल डे , संतोष नवले , रवि कांबळे , जितेंद्र पवार , प्रकाश हजारे , बापू चतुर , संजय बागवे , विजय डफळ , कुंडलिक भस्मारे , अनिल जगताप , नूर जामदार , बंडू वाडेकर , तुकाराम भोईर , इरफान शेख , याकूब कुरेशी आदीनी सहभाग घेतला . यावेळी कल्याण पूर्व पश्चिम मधील रेल्वे हद्दीत असलेल्या रिक्षा टॅक्सी स्थानक मधील रस्ते खराब असून  रस्ते दुरुस्त करा , कल्याण पूर्व मधील स्कायवाक बांधताना रिक्षा स्थानक बाधित झाल्याने ते अत्याधुनिक करावे , प्रवासी आणि रिक्षा चालकांची सुरक्षा पाहता सी सी टीव्ही कॅमेरा बसवावे . आदी मागण्यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली . 

यावेळी रेल्वे अधिकारी वर्गांनी कल्याण पश्चिम मधील रेल्वे स्थानकातील समस्या आगामी 10 दिवसात सोडवू तर कल्याण पूर्व मधील पाहणी दौरा करत काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने मंगळवार ता 19 रोजी होणारे  आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याची माहिती यावेळी रिक्षा टॅक्सी चालकमालक असोशिएशनचे अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी 'सकाळ'ला दिली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com