कल्याणमध्ये दूषित पाणीपुरवठा; नागरिक हैराण

Kalyan
Kalyan

कल्याण : कल्याण पूर्वेमधील गणेश वाडी सहित अनेक भागात दूषित आणि आळ्यामिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारी पाहता पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत दुरुस्तीची काम हाती घेतले आहे. 

कल्याण पूर्वमधील गणेश वाडी सहित अन्य भागात काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असून त्यात आळ्या सापडल्याने नागरीकामध्ये संतापाचे वातावरण आहे. कधी थंडी कधी पाऊस या बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, वाढली असताना या दूषित आणि दुर्गधी युक्त पाण्यामुळे मळमळ होण्याचे प्रकार वाढल्याने कल्याण पूर्व मधील नागरीक त्रस्त झाले असून त्यात पाण्यात आळ्या सापडल्याने खळबळ माजली आहे. या घटनेने नागरिकांत संतापचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून एक दोन दिवसात मार्ग निघेल असा दावा पालिका अधिकारी वर्ग करीत आहेत.

कल्याण पूर्वेत सोमवारी पाणी बंद ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहने उदनचन केंद्रातील पंपाच्या दुरुस्तीचे काम सोमवारी करण्यात येणार असून त्यामुळे कल्याण पूर्वेत पाणी पुरवठा बंद राहणार असून मंगळवारी पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याने नागरीकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे. 

गणेश वाडी सहित कल्याण पूर्वच्या अनेक भागात दूषित पाणी आणि आळ्या मिश्रित पाणी पुरवठा होत असून आमच्या तक्रारीनंतर पालिकेने उपाय योजना सुरू केली आहे. दुरुस्ती काम करा मात्र कायमचा तोडगा काढा अशी मागणी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी केली आहे.

गणेश वाडी परीसरात दूषित पाणी आणि आळ्या सापडल्याची तक्रार असून त्याची शोध मोहीम सुरू असून लवकरच समस्या दूर होईल, नागरिकांनी न घाबरता पाणी उकळून प्यावे काही तक्रार असल्यास प्रभाग क्षेत्र कार्यालयात करावे असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणी पुरवठा उपअभियंता अशोक घोडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com