विविध मागण्यांसाठी रिक्षा-टॅक्सी संघटना रेल्वे कार्यालयावर काढणार मोर्चा

Rail
Rail

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाच्या पूर्व पश्चिमेला रेल्वे हद्दीत असलेल्या रिक्षा टॅक्सी स्थानकातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अनेक निवदेन देऊनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याने मंगळवार (ता. 19) सकाळी अकरा वाजता रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोशिएशनचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रिक्षा टॅक्सी चालकांचा मोर्चा रेल्वे अधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. 

कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानकाच्या बाहेर रेल्वेच्या हद्दीत टॅक्सी आणि रिक्षा स्थानक आहे. कल्याण पश्चिमसोबत कल्याण पूर्वमध्ये गणपती चौक, सिद्धार्थनगर रिक्षा टॅक्सी स्थानकाअंतर्गत रस्ते दुरुस्तीबाबत रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवार (ता. 19) सकाळी अकरा वाजता रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोशिएशनचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रिक्षा टॅक्सी चालक मालक यांचा कल्याण पूर्व रिक्षा स्थानक ते कल्याण पूर्व रेल्वे स्थानक असा मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चामुळे वाहतूककोंडी झाल्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा रिक्षा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

मागण्या पुढीलप्रमाणे - रस्ते दुरुस्त करा, कल्याण पूर्वमधील स्कायवॉक बांधताना रिक्षा स्थानक बाधित झाल्याने ते अत्याधुनिक करावे, प्रवासी आणि रिक्षा चालकांची सुरक्षा पाहता सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com