बदलापुरच्या मुलांनी जिंकली बॉक्सिंग चॅम्पियनशिप 

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई : सेकंड नॅशनल एल्बो बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली. यात विविध राज्यातील तब्बल 500 खेळांडूनी सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्याचे  प्रतिनिधीत्व करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापुरच्या 'गोल्डन किडस् ऑर्गनाईज्ड बाय फ्युचर अॅकॅडमी ऑफ मिक्स मार्शल आर्ट' या क्लासच्या 10 खेळाडुंची निवड झाली. या दहाही खेळांडुनी आपला चांगला खेळ दाखवत 10 पदकांची कमाई केली आहे.      

सेकंड नॅशनल एल्बो बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत विविध राज्यातील 500 खेळाडू सहभागी असून, 'गोल्डन किडस् ऑर्गनाईज्ड बाय फ्युचर अॅकॅडमी ऑफ मिक्स मार्शल आर्ट' या बदलापुरच्या क्लासमधील 10 खेळांडुनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. 10 पदके मारून या स्पर्धेत महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमाकांचे स्थान मिळवून दिले आहे.

यात तमिल सेल्वम, बिनोद रावल, मुन्ना राज नायर, तेजस्वी शिंदे, या चौघांनी सुवर्णपदक तर निलम प्रजापती, सतिश पुन्नूस्वामी, गमन वर्मा, राहुल झुलझुले या चौघांना रौप्यपदक तसेच सुनिता अन्नमलाई आणि कुमारी तगडम यांना कांस्य पदक देण्यात आले.

कमीत कमी वेळात चांगले प्रशिक्षण देऊन स्पर्धेत खेळण्यासाठी आमचा सराव करुन घेणाऱ्या कपिलेश भरत कदम सरांमुळे आमच्यात भारतासाठी गोल्ड मेडल आणण्याची इच्छा निर्माण झाली असून, कपिलेश सरांचे प्रशिक्षण खूप मोलाचे आहे. भारतासाठी आम्ही लवकरच गोल्ड मेडल आणू, असे या खेळाडूंनी यावेळी सांगितले. तसेच कपिलेश कदम सरांचे या खेळांडूच्या पालकांनी आभार मानले आहेत.

Web Title: marathi news local sports badlapur boxing championship win