दिवाळीनंतर मंत्रिमंडळात बदलाची शक्‍यता 

Marathi news Maharashtra cabinet reshuffle after Diwali
Marathi news Maharashtra cabinet reshuffle after Diwali

मुंबई : दिवाळीची धावपळ स्थिरावल्यावर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे.नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश आणि दोन ते तीन मंत्र्यांना अर्धचंद्र असे या फेरबदलाचे स्वरूप असेल.मंत्रिमंडळात असमाधानकारक कामगिरी असलेल्या मंत्र्यांची नावे सध्या निश्‍चित करण्यात येत आहेत. सामाजिक विकासाशी संबंधित बडया मंत्र्यांना अर्धचंद्र मिळण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येते आहे. मुंबईत काम असलेल्या राज्यमंत्र्यालाही वगळण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती असून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी उत्तम चमू तयार करण्यावर भर दिला जाईल.

शिवसेनेला मंत्रिमंडळात फेरबदल करायचे आहेत काय याबाबत अजूनही संदिग्धता आहे.सुभाष देसाई ,दिवाकर रावते आणि रामदास कदम या तीन ज्येष्ठ मंत्र्यांची निवड अप्रत्यक्षपणे झाली आहे..विधानसभेचे सदस्य असणारे आमदार मंत्रिमंडळात प्रवेश करू शकत नाहीत मात्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या ंना शिवसेनेत संधी दिली जाते याचे कारण तरी काय अशी विचारणा खाजगीत आमदार करू लागले आहेत.अर्जुन खोतकर या राज्यमंत्री असणाऱ्या नेत्यालाही मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळवून देता आला नाही याबददल कमालीची नाराजी आहे. या परिस्थितीत मातोश्री नेमका कोणता निर्णय घेणार याबददल उत्सुकता आहे. नवी चमू कार्यक्षम ठरावी यासाठी डॉ. अनिल बोंडे. राजेंद्र पटनी अशा काही सहकाऱ्यांना मंत्रिदर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीरपणे विचार करीत आहेत.अर्थात राणे यांचा प्रवेश, सेनेकडून येणारी नावे आणि भाजपतील सामाजिक समतोल राखणे यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होवू शकेल काय याबाबत शंकाही व्यक्‍त केली जाते आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com