बेस्टचा कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबई : बेस्ट कामगारांचा रविवारी (ता. 6) मध्यरात्रीपासून सुरू झालेला संप 16 तासांनंतर आज अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्यानंतर बेस्ट आणि पालिकेच्या अर्थसंकल्पाचे विलीनीकरण करण्याची आणि बेस्टच्या कामगारांचे पगार वेळेवर देण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा कामगार संघटनांच्या कृती समितीने केली. मुंबईकरांची लाईफलाईन असलेली बेस्ट सेवा संपामुळे ठप्प झाल्याने मुंबईकरांचे रक्षाबंधनाच्या दिवशी मेगाहाल झाले. बेस्ट कामगारांनी संपाला शंभर टक्के प्रतिसाद दिला. 

वेतन, भत्ते, सानुग्रह अनुदान आणि इतर मागण्यांसाठी बेस्ट कामगारांच्या कृती समितीने संप पुकारला होता. दोन दिवसांपासून संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर संप सुरू झाला. तोडगा काढण्यासाठी आज दुपारी साडेतीन वाजता मातोश्रीवर सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक सुरू झाली. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी बेस्टच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. आज तोडगा निघेल की नाही, अशी भीती कामगारांना वाटत होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी बेस्टच्या कामगारांचे प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी सुरुवातीला संप झाल्याने मुंबईकरांचे हाल झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, कामगारांचे वेतन वेळेवर देण्याची जबाबदारी घेत आहे. कामगारांचे दुःख काय आहे, हे मला कळत आहे. शिवसेना तुमच्या सोबत आहे. मी स्वतः तुमच्या प्रश्‍नात लक्ष घातले आहे.

मुख्यमंत्र्यांशी तुमच्या प्रश्‍नासंर्भात बोललो आहे. आणखी एकदा त्यांच्याबरोबर चर्चा करून बेस्टमध्ये योग्य त्या सुधारणा करून बेस्टला अधिक बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करूया. सणासुदीच्या दिवशी मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी संप मागे घ्या. 
उद्धव ठाकरे यांनी प्रश्‍न सोडवण्यासाठी ग्वाही दिल्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा बेस्ट कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी केली. या वेळी बैठकीस महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, सभागृहनेते यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ, पालिकेचे आयुक्त अजोय मेहता, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, कृती समितीचे नेते शशांक राव, सुहास सामंत आदी उपस्थित होते. 

कायद्यात दुरुस्ती करणार 
बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासाठी महापालिका कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. ती करून घेऊ. तुमच्या मागण्या कशा मार्गी लागतील, ती जबाबदारी माझ्यावर आहे, असे उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कर्मचारी संघटनांच्या कृती समितीला दिली.

Web Title: marathi news marathi website mumbai news BEST Strike Mumbai Local