'एक मराठा लाख मराठाचा' एल्गार करत कल्याणमधून मोर्चा मुंबईकडे

रविंद्र खरात
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

कल्याण : 'एक मराठा, लाख मराठा'चा एल्गार करत कल्याण पूर्व पश्चिम मधील मराठा बांधव आज (बुधवार) सकाळी कल्याण रेल्वे स्थानकामधून लोकलने मुंबईकडे रवाना झाला आहे.

कल्याण रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. बाहेरगावामधून येणाऱ्या मराठा बांधवाना मुंबई कडे जाताना काही अडचण येऊ नये, म्हणून कल्याण रेल्वे स्थानकामध्ये कल्याणमधील मराठा बांधवांनी मदतीसाठी पहाटेपासून कंबर कसली होती. पाण्याच्या बाटल्या आणि नाश्ता देण्यासाठी धावपळ सुरु होती तर काहीची मुंबई कडे कसे जावे यासाठी मार्गदर्शन करत होते.

कल्याण रेल्वे स्थानक आज 'एक मराठा, लाख मराठा'चा एल्गारने वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. मोर्चा असल्याने रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता तर रेल्वे तर्फे कल्याण पूर्व - पश्चिम परिसरामध्ये विशेष तिकीट खिड़की सुरु करण्यात आल्या होत्या तेथे ही लांब लचक रांगा लागल्या होत्या.